Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market: सलग दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये पडझड; गुंतवणूकदारांचे 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान!

Share Market Update

Share Market Update: भारतीय शेअर मार्केट शुक्रवारी (दि.16 डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बीएसई (BSE) 460 अंकांनी तर खाली आला तर निफ्टी 18,300 च्या खाली बंद झाला. यामुळे या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Share Market Update: भारतीय शेअर मार्केटमधील बीएसईचा निर्देशांक (Bombay Stock Exchange- BSE) 461.22 अंकांनी खाली येऊन 61,337.81 अंकावर बंद झाला. तर निफ्टी (NIFTY) 142.25 अंकांनी खाली येऊन 18,272.65 अंकावर बंद झाला. आज शेअर मार्केटमध्ये खासकरून आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्याचे दिसून आले. यामुळे शुक्रवारी गुंतवणूकदारांचे एकूण 2.95 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

2 दिवसांत 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान!

गुरूवारी (दि.15 डिसेंबर)सुद्धा सेन्सेक्स निर्देशांक 878 अंकांनी खाली आला होता. तर निफ्टीमध्ये 265 अंकांची घसरण झाली होती. अशाप्रकारे गेल्या दोन दिवसांत शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 5.73 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)मधील लिस्टिंग कंपन्यांचे एकूण भांडवल घसरून शुक्रवारी 285.52 लाख कोटी रुपयांवर आले. जे एक दिवस अगोदर म्हणजे गुरूवारी 288.47 कोटी रुपये होते. तेच बुधवारी दि. 14 डिसेंबरला 291.25 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे बीएसई निर्देशांकामधील लिस्टेड कंपन्यांचे भांडवल आज 2.95 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. गेल्या दोन दिवसांत यामध्ये सुमारे 5.73 लाख कोटी रुपयांची घसरण झाली.

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांच्या यादीमधून फक्त 3 शेअर्समध्ये शुक्रवारी वाढ झाली. यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever), एचडीएफसी बॅंक (HDFC Bank) आणि नेसले (Nestle) या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांमध्ये 0.19 टक्क्यांपासून 0.61 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे महिंद्रा अण्ड महिंद्रा (Mahindra & Mahindra), एशिअन पेंट्स (Asian Paints), डॉ. रेड्डीज (Dr. Reddy’s), टीसीएस (TCS), स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India) या कंपन्यांच्या शेअर्स खाली आले आहेत.

263 कंपन्यांच्या शेअर्सला अप्पर सर्किट!

बीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.16 डिसेंबर) सुमारे 265 शेअर्सने अप्पर सर्किटचा टप्पा गाठला. यामध्ये बजाज हिंदुस्थान शुगर (Bajaj Hindustan Sugar), मद्रास फर्टिलायझर्स (Madras Fertilizers), एक्सिसकॅड्स टेक्नॉलॉजी (Axiscades Technologies), जिंदाल पॉली इन्वेस्टमेंट (Jindal Poly Investment), वंडर फायब्रोमॅट्स (Wonder Fibromats) आणि डीजे मिडियाप्रिंट अण्ड लॉजिस्टिक्स (D J Mediaprint & Logistics) यांचा समावेश होता. तर एकूण 125 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यातील उच्च किमतीपर्यंत पोहोचल्या होत्या.