Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Steel Stocks : Tata Steel चा 8 महिन्यांतला उच्चांक, धातू कंपन्यांना का आलेत अच्छे दिन?

Tata Steel

Image Source : www.nytimes.com

Steel Stocks : Tata Steel, Hindalco यासारख्या स्टील कंपन्या शेअर बाजारात चांगली कामगिरी करतायत. आणि त्यामुळे धातू इन्डेक्सही सहा महिन्यातल्या उच्चांकावर आहे. स्टील कंपन्यांना अच्छे दिन येण्या मागची कारणं समजून घेऊया.

साधारण 2022 चं अख्खं वर्षं सुस्त गेल्यानंतर भारतीय शेअर बाजारांमध्ये (Indian Stock Exchange) स्टील कंपनीच्या शेअरमध्ये  (Steel Company Stock) आता हालचाल दिसायाला लागली आहे. बुधवारी (5 जानेवारी) टाटा स्टील (Tata Steel) या महत्त्वाच्या स्टील कंपनीचा शेअर आठ महिन्यांतल्या उच्चांकावर म्हणजे 117 रुपयांवर पोहोचला. जुलै 2022 मध्ये टाटा स्टीलचा शेअरचं विभाजन (Split) झालं. त्यानंतरचा हा उच्चांक म्हणावा लागेल. त्याचबरोबर हिन्दाल्को (Hindalco), वेदान्ता (Vedanta), सेल (SAIL), JSW स्टील (JSW Steel) या कंपन्यांमध्येही तेजी परतल्याचं शेअर बाजार निर्देशांक सांगत आहेत.    

त्याची कारणं समजून घेऊया.    

टाटा स्टीलमध्ये तेजीची कारणं Why is Tata Steel Rocking?   

मागच्या सहा महिन्यांमध्ये टाटा स्टील शेअरने साधारणपणे 30 रुपयांची वाढ अनुभवली आहे. आणि ही वाढ 34.50% इतकी आहे. जेफरीज् या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडे टाटा स्टीलबद्दलची त्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशाच्या एकूण स्टील उत्पादनातला टाटा स्टीलचा वाटा 33% वर गेल्याचं जेफरीज् चं म्हणणं आहे.   

शिवाय टाटा स्टीलच्या सध्याच्या 5mtpa ब्राऊनफिल्ड प्रकल्पाचा विस्तार होऊन तो 8 mtpa पर्यंत पोहोचणार आहे. या विस्तारामुळे कंपनीची क्षमताही वाढणार आहे.    

यामुळे शेअर बाजारात टाटा स्टीलची मागणी वाढल्याचं जेफरीज् ना वाटतं. टाटा स्टीलचा 6 जानेवारीचा भाव NSE वर 116 रुपये इतका होता.   

tata-steel.png
Source : गूगल


  ‘मागचं वर्षभर स्टील उद्योगाची वाटचाल धिमीच होती. पण, चीनने आपलं कोव्हिड धोरण थोडसं शिथील केल्यावर तिथल्या बांधकाम उद्योगाकडून स्टीलची मागणी पूर्ववत होईल, असा आमचा अंदाज आहे. आणि तसं झाल्यावर भारतीय स्टील कंपन्यांच्या स्टीलला चांगली मागणी येईल. त्यामुळे भारतीय स्टील कंपन्या सध्या तेजीत आल्याचा आमचा अंदाज आहे,’ जेफरी ज् नी आपल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.    

स्टील कंपन्यांचं भवितव्य काय? What's in Store For Steel Companies?   

फक्त जेफरीज् च नाही तर इतर शेअर विश्लेषक संस्थाही भारतीय स्टील कंपन्यांबद्दल आश्वासक आहेत. कोव्हिड नंतर उघडलेला जागतिक बाजार हे एक कारण त्यामागे आहे, दुसरं कारण फिलीप कॅपिटल अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्टीलची मागणी वाढते आहे. त्या प्रमाणे स्टील कंपन्यांकडून जानेवारी 2023 मध्ये दरवाढही अपेक्षित आहे. आणि ती झाली तर स्टील कंपन्यांचं उत्पादन वाढून पुढच्या काही महिन्यांत स्टील कंपन्यांची कामगिरी सुधारेल. त्यामुळे टाटा स्टीलच नाही तर हिन्दाल्को, JSW स्टील अशा इतर शेअरमध्येही या आठवड्यात तेजी दिसली.   

hindalco.png
Source : गूगल 

‘क्रूड तेलासाठीची देशांतर्गत मागणी दिवसेंदिवस वाढतेय. आणि पूर्ण करण्याची क्षमता भारतीय स्टील कंपन्यांकडे आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये क्रूड तेलाची मागणी 9.6 दशलक्ष टन इतकी होती. जास्त मागणीमुळे किंमतही वाढेल. आणि स्टील कंपन्यांना त्याचा फायदा होईल,’ असं फिलीप कॅपिटल अहवालात नमूद करण्यात आलं आहे.   

स्टील कंपन्यांमधल्या तेजीमुळे निफ्टीचा मेटल इन्डेक्सही या आठवड्यात 6%नी वर गेला आहे.   

(Disclaimer : महामनी डॉट कॉम शेअर किंवा गुंतवणुकीवर कुठलीही टीप किंवा सल्ला देत नाही. शेअर बाजारातली जोखीम लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी.)