मिठापासून विमान सेवेपर्यंत विस्तारलेल्या टाटा समूहातील 24 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. मात्र यातील 12 शेअर्सने वर्ष 2022 मध्ये गुंतवणूकदारांना सपशेल निराश केले आहे. वर्षभरात टाटा स्टीलपासून टीसीएल ते टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 8% ते 59% घसरण पाहायला मिळाली.
शेअर बाजारात टाटांच्या बहुतांश शेअर्सची कामगिरी सुमार राहिली. यात टाटा पॉवर, नेल्को, टीसीएस, टाटा केमिकल्स, टाटा स्टील, टाटा कम्युनिकेशन्स या शेअर्सनी 2022 मध्ये गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान केले.
टाटा ग्रुपमधील सर्वात मौल्यवान कंपनी टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरमध्ये 2022 मध्ये 13% घसरण झाली. महागाई आणि सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ यामुळे बड्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमेरिका आणि युरोप मंदीच्या उंबरठ्यावर आहे. याचा फटका देशातील आयटी कंपन्यांना बसला. टीसीएसच्या तुलनेत गुंतवणूकदारांसाठी इन्फोसिस पसंतीचा शेअर ठरला.
वर्ष 2021 मध्ये मल्टीबॅगर ठरलेल्या टाटा मोटर्सचा शेअर वर्ष 2022 मध्ये सुमारे 21% घसरला आहे. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी 2022 वाईट वर्ष ठरले. जग्वार लॅंड रोव्हर कंपनीच्या सुमार कामगिरीचे पडसाद टाटा मोटर्सवर उमटले. अमेरिका, युरोपातील मंदीने जग्वारच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे. जग्वारच्या तुलनेत टाटा मोटर्सचा महसूल 90% अधिक आहे. मात्र तरिही टाटा मोटर्सच्या शेअरला बाजारात संघर्ष करावा लागला.
टाटा समूहातील शेअर्सची वर्ष 2022 मधील कामगिरी
| कंपनी | वर्ष 2022 मधील घसरण | 
| टाटा स्टील | -8% | 
| टाट पॉवर | -10.88% | 
| नाल्को | -13.35% | 
| टीसीएस | -13.64% | 
| टाटा मेटालिक्स | -15.08% | 
| टाटा स्टील | -17.23% | 
| टाटा कम्युनिकेशन | -17.39% | 
| रॅलिस इंडिया | - 19.98% | 
| टाटा मोटर्स | - 21.57% | 
| वोल्टास | - 36.21% | 
| ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग अॅंड असेंबल लिमिटेड | - 50.38% | 
| टाटा टेलिसर्व्हिस | - 59.8% | 
    
     
     
 
    
                
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            