जर तुम्ही कोणत्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला सरकारच्या मदतीने सुरु करता येईल असा व्यवसाय सांगणार आहोत. सध्या खरीप साठी भात खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात भात प्रक्रिया युनिट उभारून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. याला मिनी राइस मिल असेही म्हणतात. भाताचे पीक आले की प्रत्येक शेतकऱ्याला आपला माल अशा युनिटमध्ये न्यावा लागतो, जेणेकरून तांदूळ काढता येईल. ग्रामीण भागात युनिट उभे केले तर आसपासच्या परिसरात भात पिकवणारे शेतकरी सहज आपल्याकडे येऊ शकतील.
या व्यवसायासाठी लागणारा खर्च (Expenses for this business)
खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालानुसार तांदूळ प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी सुमारे एक हजार चौरस फुटांचे शेड लागणार आहे. यानंतर डस्ट बॉलर, पॅडी डायसकर, राईस पॉलिशर, ब्रान प्रोसेसिंग सिस्टिम, अँप्रेटरसर पॅडी क्लीनर खरेदी करावा लागतो. या सगळ्यासाठी सुमारे 3 लाख रुपये खर्च येऊ शकतो. याशिवाय सुमारे 50 हजार रुपये खेळते भांडवळ म्हणून ठेवावे लागणार आहेत. म्हणजेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण साडेतीन लाख रुपये लागणार आहेत. तुमच्याजवळ एवढे पैसे नसतील तर तुम्ही सरकारकडून 90 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकता. म्हणजेच तुमच्याकडे 35000 रुपये असतील तर तुम्ही हे युनिट उभारू शकता.
राइस मिल प्लांट व्यवसाय नोंदणी (Rice Mill Plant Business Registration)
व्यवसाय सुरू करताना, तुम्हाला सरकारी प्राधिकरणांकडून विविध परवाने मिळवावे लागतील.
- तुमचा व्यवसाय आरओसीमध्ये नोंदवा.
- उद्योग आधार एमएसएमई नोंदणी
- कारखाना परवाना मिळवा.
- प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 'स्थापनेसाठी संमती' आणि 'ऑपरेट करण्यासाठी संमती'साठी अर्ज करा
- राइस-मिलिंग इंडस्ट्री (नियमन) कायदा, 1958 नुसार परवान्यासाठी अर्ज करा.
- GST नोंदणी मिळवा
- तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी PFA आणि ESIC नोंदणीचे पालन केले पाहिजे.
- निर्यातीसाठी, IEC नोंदणी अनिवार्य आहे.
असे मिळेल कर्ज (Get a loan)
या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (पीईजीपी) कर्जासाठी अर्ज करता येईल. या योजनेंतर्गत 90 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या वतीने फक्त 35000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.