Stamps Scholarship UM: परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी विद्यार्थी उत्सुक असतात. दर्जेदार शिक्षण, अनोळखी देशात जुळवून घेणं, करिअरच्या संधी यासाठी बारावीनंतर भारतीय विद्यार्थी चांगल्या संधीच्या शोधात असतात. मात्र, त्यांच्या स्वप्नामधील मुख्य अडचण म्हणजे खर्च. अनेक भारतीय कुटुंबांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे परदेशात शिकण्याचा हट्ट विद्यार्थ्यांना सोडून द्यावा लागतो.
मात्र, नामांकित विद्यापीठांच्या अशा काही शिष्यवृत्ती योजना असतात ज्याद्वारे तुमचं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. (How to apply for stamps scholarship) त्यापैकीच एक अमेरिकेतील मियामी विद्यापीठाची स्टॅम्प्स शिष्यवृत्ती योजना आहे. जर ही शिष्यवृत्ती मिळाली तर पदवीचे शिक्षण मोफत होऊ शकते. मात्र, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पात्रता समजून घ्यावी लागेल. जगभरातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. बारावी पास झालेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करू शकतात.
सॅम्प्स शिष्यवृत्ती कोणासाठी आहे?
बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करता येईल.
मियामी विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती लागू आहे. सध्या अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तीचे फायदे काय आहेत?
विद्यापीठातील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्यात येईल.
विद्यापीठात राहण्याची आणि जेवणाची सोय.
विद्यार्थ्यांला आरोग्य विमा मिळेल.
लॅपटॉप आणि बुक अलाउन्स मिळेल.
विद्यार्थ्याला 12 हजार डॉलर फंड मिळेल. जो त्याला अनपेड इंटर्नशिप, रिसर्च किंवा दुसऱ्या कोर्ससाठीही वापरता येईल.
पात्रता काय?
फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्वावर अर्जांना प्राधान्य देण्यात येईल. फक्त अर्जांना प्राधान्य मिळेल. शिष्यवृत्ती निश्चित मिळेल असे समजू नये. 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत आहे.
मियामी विद्यापीठात ठराविक कोर्ससाठी का अर्ज करत आहात यासाठी 250 शब्दांपर्यंत विस्तृत निबंध लिहून द्यावा लागेल. तसेच वैयक्तिक नोट 650 शब्दांपर्यंत लिहून द्यावी लागेल. यामध्ये तुमचे करिअर गोल्स, शिक्षण घेण्यामागील कारण, कौशल्य, तुमची विचारसरणी पाहिली जाईल.
अर्ज शॉर्टलिस्ट झाल्यानंतर विद्यापीठातर्फे मुलाखत घेण्यात येईल. मुलाखत यशस्वीरित्या दिली तर तुम्हाला कोर्सला प्रवेश मिळेल. त्यासाठी सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील. तसेच विद्यापीठाच्या इतर काही अटी असतील त्या पूर्ण केल्यानंतरच अॅडमिशन मिळेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            