Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Spiritual Tourism in India: आध्यात्मिक पर्यटनाकडे ओघ वाढतोय, या कारणांनी तीर्थक्षेत्रांवर पर्यटकांची होतेय गर्दी

spiritual tourism growth reasons

Spiritual Tourism in India: समुद्र किनारे, हिल स्टेशन्स, थंड हवेची ठिकाणे, जंगल सफारी यासारख्या पर्यटनाबरोबरच भारतात आध्यात्मिक पर्यटनाकडे पर्यटकांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतल्यानंतर धार्मिक स्थळांचे रुप पालटले आहे.

समुद्र किनारे, हिल स्टेशन्स, थंड हवेची ठिकाणे, जंगल सफारी यासारख्या पर्यटनाबरोबरच भारतात आध्यात्मिक पर्यटनाकडे पर्यटकांचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतल्यानंतर धार्मिक स्थळांचे रुप पालटले आहे. या ठिकाणी दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा, खानपानची उत्तम सोय अशांमुळे दर्शन आणि पर्यटन अशा उद्देशाने धार्मिक स्थळे पर्यटकांसाठी पहिली पसंती ठरक आहेत.  

धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची संख्या मागील काही महिन्यांत सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे धार्मिक ठिकाणे आणि त्या शहरांमधील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरल्यानंतर आध्यात्मिक पर्यटन क्षेत्रात मोठी उलाढाल दिसून आली आहे. शिर्डी, तिरुपती, वाराणसी या सारख्या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 100 ते 400% वाढ झाली आहे.

ओयो कल्चर ट्रॅव्हल 2022 च्या अहवालानुसार वाराणसी हे आधात्मिक पर्यटन करणाऱ्या पर्यटकांचे पहिल्या पसंतीचे धार्मिक स्थळ ठरले आहे. त्याशिवाय तिरुपती, पुरी, अमृतसर, हरिद्वार, शिर्डी, मथुरा, ऋषिकेश, मदुराई यादी ठिकाणे आधात्मिक पर्यटनाची नवीन केंद्र म्हणून उदयास आली आहेत. मागील एक वर्षात या ठिकाणी भेट देणाऱ्या  पर्यटकांची संख्या वाढली आहे.


ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या काळात आध्यात्मिक पर्यटन केलेल्या पर्यटकांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार उत्तरप्रदेशातील वाराणसीला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली. 13 ऑगस्ट 2022 रोजी पर्यटकांचा आकडा प्रचंड होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शिर्डीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत तब्बल 483% वाढ झाली. तिरुपतीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 233% वाढ झाली असून याच काळात पुरी शहरातील पर्यटकांच्या संख्येत 117% वाढ झाली.

यापूर्वी पर्यटक समर हॉलिडेज, विंटर ट्रीप्सनुसार पर्यटनाला जात असत. मात्र आता आधात्मिक पर्यटनाला तितकेच महत्व दिले जात आहे. विशेष म्हणजे तरुणाईचा आध्यात्मिक पर्यटनाकरिता पुढाकार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदीर निर्माण कार्य सुरु केले आहे. याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये देखील अनेक विकास कामे केली जात आहे. काशी आणि परिसराचा विकास केला जाणार आहे.

आधात्मिक पर्यटन वाढीची ही आहेत कारण

  • कोरोनानंतर आधात्मिक पर्यटनाकडे लोकांचा ओघ वाढला
  • तीर्थस्थळांचा विकास झाल्याने तेथे दळणवळणाची सुविधा निर्माण झाली.
  • ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आधात्मिक पर्यटनाचे डिस्काउंटमध्ये पॅकेजेस
  • भारतीय रेल्वेकडून स्वदेश दर्शन, जगन्नाथ एक्सप्रेस, रामायण एक्सप्रेस अशा विशेष एक्सप्रेस गाड्यांची सेवा
  • तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर बजेटमध्ये मोठी तरतूद
  • उत्तर प्रदेश सरकारकडून रामायण आणि बुद्धीस्ट टुरिस्ट सर्किटकरिता 10000 कोटींची तरतूद
  • महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमधील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा विकास
  • PRASHAD मोहीमेअंतर्गत देशातील 45 तीर्थस्थळांच्या विकासासाठी 1586.10 कोटींची तरतूद

परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष मोहीम

केंद्र सरकारने परदेशी पर्यटकांना  आकर्षित करण्यासाठी व्हीजीट इंडिया इयर 2023 या मोहीमेची घोषणा केली आहे. पर्यटन मंत्रालयाकडून ही मोहीम राबवली जाणार आहे. यंदाच्या वर्षासाठी भारताला जी-20 देशांचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्याशिवाय भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे सरकार जास्तीत जास्त परदेशी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. सरकारने भारतातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नॅशनल मिशन ऑन पिलग्रिमेज रिज्युवेंशन अॅंड स्पिरिच्युअल अॅंड हेरिटेज ऑगुमेंटेशन ड्राईव्ह (PRASHAD)या मिशनची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील 45 तीर्थस्थळांच्या विकासासाठी 1586.10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आध्यात्मिक पर्यटन म्हणजे काय? What do you mean by spiritual tourism?

आध्यात्मिक पर्यटन किंवा तीर्थयात्रा या मुख्यत्वेकरुन देवदर्शनाच्या उद्देशाने केल्या जातात. कुलदेवाला जाणे किंवा प्रमुख तीर्थक्षेत्रांना दर्शनासाठी भेटी देणे याकरिता भाविक कुटुंबासह तिर्थाटनाला निघतात. भारतात शिर्डी येथील साईबाबा मंदीर, आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदीर, जम्मूमधील माता वैष्णव देवी अशा प्रसिद्ध धार्मिक स्थळांना दररोज हजारो सर्वधर्मीय भाविक भेटी देतात.