Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Special Investment Scheme : 'या' विश्वसनीय बँकांनी आणली स्पेशल इनवेस्टमेंट स्कीम, होईल मोठी बचत

Special Investment Scheme

Image Source : www.hindi.economictimes.com

Fixed Deposit Scheme : तुम्ही जर या जून महिन्यात गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर हा महिना तुमच्या करता सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. ग्राहकांना जून महिन्यात 3 विशेष योजनांमध्ये गुंतवणूक करुन प्रचंड नफा मिळवण्याची शेवटची संधी आहे. या विशेष ठेव योजनांवर बँका 8 टक्के दराने व्याज देत आहे.

Fixed Deposit Rate Of Interest : जर तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल आणि गॅरंटीसह अधिक नफा मिळवू इच्छित असाल, तर SBI, इंडियन बँकेच्या 3 विशेष FD योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी या जून महिन्यात आहे. बँका फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. त्यामुळे बचत करण्याचा हा एक उत्तम पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

SBI अमृत कलश योजना

स्टेट बँक ऑफ इंडियाची 400 दिवसांची विशेष FD योजना SBI अमृत कलश योजना ( SBI Amrit Kalash) ही गुंतवणूकदारांना इतर FD पेक्षा जास्त व्याजदर देते. बँकेने SBI अमृत कलश ठेव योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 जून 2023 निश्चित केली आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार,अमृत कलश या 400 दिवसांच्या कालावधीच्या विशेष ठेव योजनेवर सामान्य गुंतवणूकदारांना 7.10 % व्याजदर दिला जात आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणुकीवर 7.60 % व्याजदर दिला जात आहे. SBI च्या मते, गुंतवणूकदार 12 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत अमृत कलश योजनेत गुंतवणूक करू शकतात.

SBI We Care योजना

SBI ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करण्यासाठी SBI We Care ठेव योजना (SBI We Care Interest Rates) राबवित आहे. या विशेष We Care ठेव योजनेतील गुंतवणूक कालावधी 5 आणि 10 वर्षे आहे. बँक SBI We Care च्या गुंतवणूकदारांना 7.50 टक्के दराने व्याज देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या विशेष गुंतवणूक योजनेत ग्राहक ३० जून २०२३ पर्यंत गुंतवणूक करू शकतात.

इंडियन बँक स्पेशल एफडी

इंडियन बँक (Indian Bank) आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीच्या रकमेवर अधिक बचत करण्याची संधी देण्यासाठी इंड सुपर 400 दिवस (IND SUPER 400 DAYS) विशेष मुदत ठेव योजना रावबित आहे. इंडियन बँक या FD योजनेवर सर्वसामान्यांना गुंतवणुकीवर ७.२५ % व्याजदर देत आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७५ % दर देत आहे.

विशेष म्हणजे गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची इंड सुपर 400 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक संख्या जर जास्त झाली, तर  त्यांना 8.00 % व्याजदर दिला जाणार आहे. बँकेच्या मते, या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.