Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Special Bank FD for Senior Citizen: ज्येष्ठ नागरिक 'या' तीन बँकांच्या विशेष मुदत ठेवीत करू शकतात गुंतवणूक, वाचा सविस्तर

Special Bank FD for Senior Citizen

Image Source : www.rightsofemployees.com

Special Bank FD for Senior Citizen: उतार वयात आत्मसन्मानाने जगायचे असेल, तर आर्थिक तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे. बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) राबविली जाते. ज्यामध्ये सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळतो. कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना राबवत आहेत, जाणून घेऊयात.

उतार वयात आत्मसन्मानने जगाता यावे यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे. ही आर्थिक तरतूद वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते. मुदत ठेव योजना (FD) या सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या गुंतवणूक पद्धतीमध्ये गणल्या जातात. ग्राहकांनी सर्वाधिक गुंतवणूक करावी या हेतूने बँका विशेष मुदत ठेव योजना  (Special Fixed Deposit Scheme) राबवितात. आज आम्ही तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांनी सुरू केलेल्या विशेष मुदत ठेव योजनेबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक आत्मसन्मानाने जगू शकतात आणि सर्वाधिक परतावा मिळवू शकतात. कोणत्या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे, जाणून घेऊयात.

आयसीआयसीआय बँक गोल्डन इअर मुदत ठेव योजना (ICICI Golden Year FD Scheme)

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी गोल्डन इअर मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवता येऊ शकतो. ही योजना 20 मे 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एका दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के व्याजासह 0.10 टक्के अधिक व्याजदर मिळणार आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर मिळणार आहे.

एसबीआय वी केअर मुदत ठेव योजना (SBI We Care FD Scheme)

सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर मिळणार असून 0.50 टक्के जास्त व्याजदराचा लाभ मिळणार आहे. एसबीआय वी केअर मुदत ठेव योजनेत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल. याचा गुंतवणूक कालावधी हा कमीत कमी 5 वर्ष तर जास्तीत जास्त 10 वर्षासाठी निश्चित करण्यात आला आहे.

एचडीएफसी ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजना (HDFC Senior Citizen FD Scheme)

एचडीएफसी बँकेने जेष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेत ग्राहक 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ग्राहकांना 0.50 टक्क्यांसोबत 0.25 टक्के वाढीव व्याजदाराचा लाभ मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर एकूण 0.75 टक्क्यांचे व्याजदर मिळणार आहे. यातील गुंतवणूक कालावधी 5 ते 10 वर्षापर्यंत निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर मिळणार आहे.

Source: hindi.moneycontrol.com