Top South Movie 2022: हे वर्ष साऊथ इंडस्ट्रीसाठी एकदम खास होते. यावर्षी बॉक्स ऑफिसवर साऊथ चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. या चित्रपटांसोबतच कलाकारांचादेखील गौरव करण्यात आला. म्हणूनच जाणून घेऊ, साऊथचे हे सुपरहिट चित्रपटांची नावे व त्यांची कमाई.
Table of contents [Show]
केजीएफ-चॅटर-2 (K.G.F: Chapter 2)
केजीएफच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने केजीएफ 2 ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रशांत निल दिग्दर्शित केजीएफ-चॅटर-2 हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित झाला. अक्षरश: प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतले. या चित्रपटाने साधारण बॉक्स ऑफिसवर 1,250 करोड रूपयांची कमाई केली.
आरआरआर (RRR)
ट्रीपल आर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडले. 24 मार्च 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाण्यानेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले. हा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड यादीतदेखील सामील झाला आहे. एस.एस. राजामौली (S.S. Rajamouli) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात एनटीआर (NTR), रामचरण (Ramcharan), आलिया भट्ट (Alia Bhatt) व अजय देवगण (Ajay Devgan) प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले. आरआरआर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1,200 करोड रूपये कमविले.
कांतारा (Kantara)
ऋषभ शेट्टी यांच्या कांतारा या चित्रपटाने 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी बाजी जिंकली. माणूस व निसर्ग यांच्या नातेसंबंधावर आधारित हा चित्रपट आहे. भारतात यावर्षी सर्वाधिक पसंती या चित्रपटाला मिळाली. धनुष, अनुष्का शेट्टी, विवेक अग्नीहोत्री, कंगना रनौत, प्रभास या सुपरहिट कलाकरांनीदेखील सोशल मिडीयावर या चित्रपटाचे कौतुक केले. बॉक्स ऑफिसवर जवळजवळ या चित्रपटाने 400 करोडचा गल्ला मिळविला.
पुष्पा (Pushapa)
भारतात 2022 हे वर्ष पुष्पा या चित्रपटाने अक्षरश: गाजविले. या चित्रपटातील श्रीवल्ली, सामे सामे या गाण्यांनी तर धुमाकूळ घातला. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अल्लू अर्जुन (Allu Arjun) व रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 करोडपेक्षा ही अधिक रक्कम कमविली.