Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Year End 2022 in Top Movie : 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे बॉलिवुड चित्रपट

Year End 2022 in Top Movie

2022 Bollywood Collection list: देशात मुंबईला आर्थिक राजधानी म्हटले जाते. याच शहरात बॉलिवुड इंडस्ट्रीची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होते. भले 2022 मध्ये ‘बॉयकॉट’ चित्रपटचा ट्रेंड आला असला, तरी काही बॉलिवुड चित्रपटांनी अफाट पैसा कमिवला आहे. अशाच काही बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची जादू करणारे टॉप 5 बॉलिवुड चित्रपट पाहुयात.

2022 Superhit Movie on Box Office: 2022 मध्ये बॉलिवुडची अनेक चित्रपट प्रदर्शित झाली आहेत. यापैकी काही बॉलिवुड चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. चला, तर पाहुयात 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे बॉलिवुड चित्रपट कोणते?

गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)

2022 मध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) ची भूमिका प्रचंड गाजली होती. हा चित्रपट वेश्या व्यवसायावर आधारित होता. संजय लीला भन्साळीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 200 करोडची कमाई केली होती.

Gangubai Kathiawadi
http://www.lehren.com/


 द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट खूपच चर्चेत होता. हा चित्रपट कश्मीरी पंडितांवर आधारित होता. बॉलिवुडचा हा 13 वा चित्रपट आहे, ज्याने 250 करोड रूपयांपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटात अभिनेता अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती झळकले होते. अभिनेता चिन्मय मांडलेकरचीदेखील भूमिका पाहायला मिळाली. 

The Kashmir Files
http://www.zee5.com/

भुल भुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2)

कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘भुल भुलैया 2’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात कार्तिकसह कियारा अडवाणी, राजपाल यादव, तब्बू हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटाने जवळपास 263 करोंडचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमविला होता.

Bhool Bhulaiyaa 2
http://www.youtube.com/

दृश्यम 2 (Drushyam 2)

अजय देवगण (Ajay Devgan) चा चित्रपट 'दृश्यम 2' ने देखील या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत समावेश केला आहे. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. साधारण 'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा जादुई आकडा पार केला आहे.

Drushayan 2
http://www.mtwikiblog.com/

ब्रह्मास्त्र (Brahmastra) 

आयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये अडकलेल्या या चित्रपटाने 257.44 कोटी रुपयांची कमाई केली.

Bramhastra
http://www.tech.hindustantimes.com/