एक दिलदार आणि मदतीसाठी कायम तत्पर असलेला अभिनेता म्हणून सोनू सूद ओळखला जातो. कोविड संक्रमणाच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्याने केलेली मदत, अर्थसहाय्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल. त्याचे हे सामाजिक काम पुढे घेऊन जाण्यासाठी त्याने ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’ नावाने एक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत सोनुने त्याची आई दिवंगत प्रा. सरोज सूद यांच्या नावे एक खास शिष्यवृत्ती सुरु केली आहे. या शिष्यवृत्तीचा तुम्ही देखील फायदा घेऊ शकता. तुम्ही देखील आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित असाल तर लागलीच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा.
Table of contents [Show]
प्रा. सरोज सूद शिष्यवृत्ती 2023
यावर्षी पासून ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’ तर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल. आर्थिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाहीये असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, फाउंडेशनने ठरवून दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळेल. या शिष्यवृत्तीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कुणाला मिळेल शिष्यवृत्तीचा लाभ?
ज्या विद्यार्थ्यांनी 12 वी उत्तीर्ण केलेली असेल असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच 12 वी नंतर ज्या विद्यार्थ्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे अशांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिष्यवृत्तीची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीची नेमकी रक्कम किती असेल हे फाउंडेशनने अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.
प्रत्येक अभ्यासक्रमासाठी खर्च वेगवेगळा असतो हे लक्षात घेऊन शाखानिहाय प्रवेश आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.
पढ़ाई आपकी
— sonu sood (@SonuSood) August 26, 2022
ज़िम्मेदारी मेरी ❤️
हर घर का हर बच्चा पढ़ेगा,
तभी तो ये देश बढ़ेगा।
Registrations now Open for #ProfSarojSoodScholarships
Details on https://t.co/juJL7Wk4oo@SoodFoundation ?? pic.twitter.com/FP8KtZv6ZB
पात्रता निकष काय?
- विद्यार्थ्याने 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- केवळ भारतीय नागरिकत्व असलेल्या विद्यार्थ्यालाच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे.
- विद्यार्थ्याने उच्च शिक्षणासाठी म्हणजेच ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्ससाठी प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त नसावे
कोणत्या अभ्यासक्रमांसाठी मिळेल शिष्यवृत्ती?
- हॉटेल मॅनेजमेंट
- लॉ कोर्स
- इंजिनीअरिंग
- मेडिकल
- स्पेशल एज्युकेशन, शिक्षण आणि तंत्रज्ञान
- कॉम्प्युटर कोर्स
- व्यवस्थापन अभ्यास
- कृषी अभ्यास
- हेल्थकेअर सायन्स अभ्यास
- पॅरा मेडिकल सायन्सेसचा अभ्यास
- विमानसेवा आणि पर्यटन इत्यादी
- आवश्यक कागदपत्रे कुठली?
- 10वी आणि 12वी शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रे
- आधार कार्ड किंवा मतदार कार्ड
- रहिवासी दाखला
- आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे प्रमाणपत्र (Economical Weaker Section Certificate)
- उत्पन्नाचा दाखला
- अर्जदाराचा जातीचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज करा
'प्रा. सरोज सूद शिष्यवृत्ती 2023' साठी अर्ज एससीएफच्या अधिकृत वेबसाइटवर https://soodcharityfoundation.org/ फॉर्म भरू शकता.
तसेच supportus@soodcharityfoundation.org या इमेल आयडीवर या शिष्यवृत्तीसाठी सविस्तर लिहू शकता. सूद चॅरिटी फाउंडेशनचे स्वयंसेवक तुमच्याशी संपर्क करतील आणि पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन करतील.