आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि इंटरनेटच्या वाढत्या जाळ्यामुळे व्यवसाय आणि नोकऱ्यांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. आता माणसांची गरज कमी झाली असून त्यांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन कामाच्या कक्षा आणि संधी ही वाढत आहेत. यातून लोकांना एक्सपोझर बरोबर चांगले पैसेही मिळत आहेत. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करण्याऐवजी अनेकजण अर्धवेळ किंवा सोयीनुसार काम करून ऑनलाईन पैसे कमावत आहेत. आपल्या स्मार्टफोनद्वारेही पैसे कमावता येतात. तर आज आपण अशाच घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे विविध मार्ग पाहणार आहोत.
आज इंटरनेटवर कोट्यवधींनी कामे आणि नोकऱ्या उपलब्ध आहेत. यातील बरीच कामे ऑनलाईन आहेत; भविष्यात ही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तुम्हालाही वर्क फ्रॉम होम किंवा स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय किंवा सोयीनुसार ऑनलाईन कामे करून पैसे मिळवण्याची माहिती घेऊ.
कंटेट रायटिंग (Content Writing)
तुमचे लेखन जर चांगले असेल तर तुम्ही विविध विषयांवरील लेख लिहून चांगले पैसे कमावू शकता. आज इंटरनेट अनेक वेबसाईट आहेत, ज्यांना अशाप्रकारच्या लेखनाची गरज आहे. त्यांना तुम्ही प्रतिशब्दाच्या किमतीने लेख लिहून दिल्यास तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. अर्थात, यात लेखनाचा दर्जा, वैविध्यपूर्णता, विषयाची मांडणी या सर्व गोष्टी अंतर्भूत आहे.
ऑनलाईन फोटो एडिटिंग (Online Photo Editing)
कॅनवा (canva) ही एक एडिटिंग वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन काम करून महिन्याला किमान 40 ते 50 हजार रूपये कमवू शकता. कॅनवामध्ये फोटो किंवा व्हिडिओ एडिट करू शकता. तसेच वेबसाईटसाठी तुम्ही इन्फोग्राफिक्स सुद्धा करू शकता. या फोटो, व्हिडिओ आणि इन्फोग्राफिक्सची विक्री करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. कॅनवामध्ये खूप सारे पर्याय दिले असून तुम्ही याचा चांगला सराव केला तर एक चांगले फोटो किंवा व्हिडिओ एडिटर होऊ शकता.
ऑनलाईन ट्युटोरिअल (Online tutorial)
ऑनलाईन ट्युटोरिअल हा घरबसल्या पैसे कमावण्याचा चांगला मार्ग आहे. तुम्ही जर एखाद्या विषयात चांगले पारंगत असाल किंवा तुम्ही इतरांना चांगल्याप्रकारे शिकवू शकता. तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ऑनलाईन ट्युटोरिअल सुरु करून चांगले पैसे कमावता येतात.
शेअर मार्केट आणि ट्रेडिंग (Share Market & Trading)
शेअर मार्केट आणि ट्रेडिंगचे योग्य ज्ञान तुम्ही आत्मसाद केले तर तुम्हाला मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर काम करून चांगले पैसे मिळू शकतात. शेअर मार्केटविषयीचे अनेक युट्यूब आणि टेलिग्राम चॅनेल मोफत उपलब्ध आहेत. यांच्या मदतीने तुम्ही शेअर बाजाराचा अभ्यास करू शकता. यात तुम्ही यशस्वी झाला तर दिवसभरात सकाळी 9 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत काम करून चांगला नफा मिळवू शकता. आज अनेक जण शेअर मार्केटच्या माध्यमातून लाखो रूपये कमवत आहेत. पण यासाठी शिस्तबद्धता, शेअर बाजाराचा अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
यूट्यूब (YouTube)
सोशल मिडियाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज प्रत्येकाला यूट्यूबवर व्हिडिओ पाहणे आवडते. तुम्ही ही स्वत:चा यूट्यूब चॅनेल सुरू करून लाखो रुपये कमवू शकता. तुम्हाला कोणत्याही क्षेत्राची आवड असो. त्यासाठी तुम्ही युट्यूबचा माध्यम म्हणून वापर केला तर ऑनलाईन पैसे कमविण्याचा हा तुम्हाला चांगला पर्याय ठरू शकतो. यूट्यूबच्या माध्यमातून एक तर तुम्ही पैसे ही मिळवू शकता आणि तुमची मोफत प्रसिद्धी ही होते. तुमच्या चॅनेलचे 1 हजार सबस्क्राईबर्स (subscribers) झाले आणि तुमचे व्हिडिओ 4 हजार तासांपेक्षा पाहिले गेले की, तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात.
ऑनलाईन सर्वे (Online Survey)
ऑनलाईन सर्वे हा पैसे मिळविण्याचा सोपा मार्ग आहे. ब्रँड नेम कॉर्पोरेशन, मार्केट रिसर्च फर्मस् आणि विविध सेवांविषयी लोकांची मते जाणून घेण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या ऑनलाइन सर्वे करून घेतात. यातून चांगले पैसे मिळतात. बाहेरच्या देशातील कंपन्या अशा सर्वेसाठी डॉलरमध्ये पैसे देतात. यासाठी काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे असते. त्यात तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला ही ऑनलाईन सर्वे करणं सहज जमू शकेल आणि चांगले पैसे ही कमावता येतील.
ऑनलाईन पैसे कमावण्याच्या अशा अनेक संधी आणि पर्याय उपलब्ध आहेत. यातून तुम्ही तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्याच्यातील कौशल्ये शिकून ऑनलाईन इंटरनेटद्वारे पैसे कमवू शकता.