शेतातून चांगले उत्पादन मिळण्यासाठी जमितीचा पोत चांगला असणे गरजेचे आहे. तसेच ती जमीन सुपीक असणे आवश्यक आहे. शेतीतील माती सुपीक असेल तर उत्पन्नही चांगले मिळू शकते. मात्र अनेक प्रदेशातील जमिनींची सुपीकता कमी झाल्याचे दिसून येते. यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये 'सॉईल हेल्थ कार्ड' ही योजना सुरू केली. या योजने अंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतातील मातीचे आरोग्य सुधारून ती सुपीक बनवू शकतो.
केंद्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी कमी उत्पादनातून जास्त नफा मिळवल्यास शेतकऱ्यांना लागवडीसाठी नवीन उत्साह मिळू शकतो. यासाठी शेतातील मातीची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. सरकारने हे ओळखून ‘सॉईल हेल्थ कार्ड’ ही योजना आणली आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना मातीच्या गुणवत्तेच्या आधारे पिके घेण्यास मदत होऊ शकते.
सॉईल हेल्थ कार्ड म्हणजे काय? (What is a Soil Health Card?)
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक कार्ड दिले जाते. या कार्डावरून शेतातील माती कोणत्या प्रकारची आहे हे कळते. शेतकरी आपल्या जमिनीच्या आधारे पिकांची पेरणी करून चांगला नफा मिळवू शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या गुणवत्तेनुसार तीन वर्षांतून एकदा सॉईल हेल्थ कार्ड देण्यात येते.
सॉईल हेल्थ कार्ड कसे तयार होते? (How are soil health cards prepared?)
- सॉईल हेल्थ कार्डसाठी कृषि अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेतात.
- हा नमुना प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविला जातो.
- संशोधन करणारी टीम मातीच्या नमुन्याची तपासणी करून त्याचा पोत ठरवते.
- शेतातील जमिनीत पोषक तत्वांची कमतरता असल्यास ती सुधारण्यासाठी अधिकारी सूचना देतात.
- शेतकऱ्याच्या नावासह अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड केला जातो.
अर्ज करण्याची पद्धत
- केंद्र सरकारच्या soilhealth.dac.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होम पेजवरील लॉगिन पर्यायावर क्लिक करा
- तिथे तुमचे राज्य निवडून 'Continue' वर क्लिक करा.
- लॉगिननंतर 'Registration New User' या पर्यायावर क्लिक करा.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.
- नोंदणीनंतर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉग इन करा
Source: www.zeenews.com