Smartphone Small Hole Uses: सध्याचा काळ हा 'डिजिटल युगाचा आहे. त्यामुळेच तर आता प्रत्येक गोष्टींसाठी गॅझेट(Gadgets) उपलब्ध झाले आहे. डिजिटल क्रांतीमुळे आपल्या बर्याच अडचणी सोडवल्या जाऊन तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्याला आवश्यक अशा सर्व गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. जर तुमच्याकडे स्मार्टफोन(Smartphone) असेल तर एकदा व्यवस्थित निरखून पाहा. तुमच्या स्मार्टफोनमध्ये वरच्या बाजूला एक छोटंसं होल असेल तर तुमचं काम सोपं झालंच म्हणून समजा. आता तुम्ही म्हणाल याचा काय उपयोग, तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
रिमोट्चे काम करेल छोटंसं होल(A small hole will do the work of the remote)
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वरच्या बाजूला एक छोटंसं होल असेल तर या डॉटच्या उपयोगामुळे तुम्हाला रोजच्या कटकटीपासून सुटका मिळणार आहे. हे फीचर चायना फोनमध्ये(China phones) देण्यात येते. हा छोटंसं होल साधंसुधं नसून आयआर ब्लास्टर(IR blaster) आहे, ज्यामधून इंफ्रारेड वेव्स(Infrared waves) फेकले जातात. तुमचा टीव्ही आणि एसीचा रिमोर्ट काम करतो अगदी त्याच प्रमाणे या इंफ्रारेड वेव्सच्या माध्यमातून टीव्ही आणि एअर कंडीशनर अॅक्सेस करता येऊ शकणार आहे.
एकदा तुम्हाला या फीचर्सबद्दल कळलं की, तुम्ही तुमच्या घरातील गॅझेट हातातील स्मार्टफोनच्या (Uses of small hole in smartphone) माध्यमातून ऑपरेट करू शकणार आहेत. यासाठी आता तुम्हाला हरवलेला रिमोट शोधण्याची गरज नाही. तुमच्या घरगुती उपकरणांचा रिमोट यापुढे जर काम करत नसेल तर तुमचा स्मार्टफोन तुम्हाला मदत करणार आहे.
आयआर ब्लास्टर अॅप डाउनलोड करा(Download the IR Blaster app)
तुम्हाला तुमच्या घरातील टीव्ही (Television) आणि एसी(AC) नियंत्रित करण्यासाठी आयआर ब्लास्टर वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आयआर ब्लास्टर अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. काही स्मार्टफोनमध्ये(Uses of small hole in smartphone) हे अॅप प्री-इंस्टॉल केलेले असते परंतु तुमच्या फोनमध्ये हे अॅप नसल्यास, तुम्ही Google Play Store वरून ते डाउनलोड करू शकता. यानंतर तुम्हाला हे अॅप डिव्हाइससोबत जोडावे लागेल. अगदी काही मिनिटांच्या प्रोसेसनंतर तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या घरातील उपकरणं ऑपरेट करू शकाल.