कोणत्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा मिळेल, हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असतो. मात्र, त्याआधीही एका प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमचे गुंतवणुकीमागील ध्येय कोणते आहे. जर तुम्हाला माहित नसेल की, तुम्ही गुंतवणूक कशासाठी करत आहात, तर पैसे किती वर्ष गुंतवायचे व कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणायचे याबाबत स्पष्टता राहणार नाही. जर तुम्ही स्मार्ट पद्धतीने गुंतवणूक केली तर तुमच्या मनामध्ये कुठे, किती आणि कशी गुंतवणूक करावी याबाबत शंका राहणार नाही.
गुंतवणूक स्पेसिफिक असावी (S - Specific)
जर तुम्हाला घर घ्यायचे असेल तर त्याबाबत स्पष्टता हवी. फक्त घर घ्यायचे यातून स्पष्टता येणार नाही., 1 बीएचके की 2 बीएचके हे ठरवल्यानंतर त्यासाठी नक्की किती रक्कम तुम्हाला लागणार आहे, याचा अंदाजा येईल. घर फक्त एक उदाहरण झाले, तुम्ही इतरही कोणत्या पर्यायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्पष्टता हवी. फक्त ढोबळमानाने गुंतवणुकीच्या विचारातून तुम्हाला स्पष्टता मिळणार नाही.
गुंतवणूक मेजरेबल (Measurable) असावी
गुंतवणूक मोजमाप करता येईल अशी असावी. घराचे उदाहरण पाहात, जर तुम्ही 1BHK घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की किती रक्कम लागेल, याचा तुम्हाला अचूक अंदाज येईल. त्यासाठी किती रक्कम लागेल हे तुम्हाला समजेल. जर घराची किंमत 70 लाख रुपये असेल तर किमान डाऊन पेमेंटसाठी किती रुपये लागतील हे सुद्धा तुम्हाला समजेल त्यानुसार तुम्ही पैशांची व्यवस्था करु शकता. किंवा त्यानुसार भविष्यात गुंतवणुकीचे पर्याय ठरवू शकता.
गुंतवणूकीचे ध्येय पूर्ण होण्याजोगे असावे (Achievable)
तुम्ही गुंतवणूकचे जे काही ध्येय ठरवाल ते भविष्यात पूर्ण होण्याजोगे असावे. त्यासाठी ठरवलेला कार्यकाळही पुरेसा असावा. उदाहरणार्थ, तुम्हाला पाच वर्षानंतर 14 लाख रुपये एखाद्या बाबीसाठी सेव्ह करायचे आहेत. तर तुम्हाला महिन्याला 17 हजार 150 रुपये गुंतवावे लागतील. सुमारे 12 टक्के दराने तुम्हाला परतावा मिळाल तर 14 लाख रुपये साठतील. जर तुम्ही 17 हजारापेक्षा कमी गुंतवणूक केली तर तुमचे ध्येय पूर्ण होणार नाही.
गोल रिअलिस्टिक असावे (Realistic)
तुम्ही जे गुंतवणूकीचे ध्येय ठरवत असाल ते वास्तवादी हवे. तुमच्या उत्पन्नानुसार गुंतवणुकीची मर्यादा आणि ध्येय ठरवा. समजा, तुम्हाला 50 हजार पगार असेल आणि पुढील 3 वर्षात तुम्ही 1 कोटी किंमतीचे घर घेण्याचा विचार करत असाल तर हे ध्येय तुम्हाला गाठता येणार नाही. त्यासाठीची कालमर्यादा आणि लागणारी गुंतवणूक वास्तववादी असावी.
वेळेची मर्यादा - Time bound goal
गुंतवणूक करताना वेळ खूप महत्त्वाची असते. भविष्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी 20 लाख 5 वर्षांनंतर राखून ठेवणार असाल तर वेळ महत्त्वाचा घटक आहे. कारण, महागाईचा दरही तुम्हाला विचारात घ्यावा लागेल. पाच वर्षानंतर 20 लाखांचे बाजारमूल्य आजच्या मुल्याइतके नसेल. त्यामुळे ती रक्कम तुम्हाला कमी पडू शकते. गुंतवणूक करताना वाढती महागाई, गुंतवणूक पर्यायातील दरवाढीचा विचार तुम्ही करायला हवा.