Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Vs RD: भविष्यात मोठा फंड तयार करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल अधिक प्रभावी, जाणून घ्या

SIP Vs RD

SIP Vs RD: भविष्यात मोठा फंड तयार करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करायला हवी. त्यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) आणि पोस्टातील आवर्ती ठेव योजनांमध्ये (Recurring Deposit Scheme) मासिक आधारावर गुंतवणूक करता येते. यापैकी कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरेल, जाणून घेऊयात.

भविष्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आज केलेली गुंतवणूक उद्यासाठी मोठा फंड तयार करू शकते. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये मुदत ठेव (FD), शेअर्स (Shares), म्युच्युअल फंडातील एसआयपी पद्धत (SIP), पोस्ट ऑफिसमधील वेगवेगळ्या योजनांचा (Post Office Scheme) समावेश करण्यात आला आहे. यामधील प्रत्येक ठिकाणी मिळणारा व्याजदर (Interest Rate), गुंतवणूक कालावधी (Investment Period) आणि परतावा (Returns) हा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे.

सध्या बहुसंख्य लोक म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहेत. एसआयपीप्रमाणे पोस्टातील आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) मासिक आधारावर गुंतवणूक करता येते. जर तुम्हीही भविष्यासाठी मासिक आधारावर गुंतवणूक करून मोठा फंड तयार करण्याचा विचार करत असाल, तर कुठे केलेली गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरेल आणि सर्वाधिक परतावा मिळवून देईल, जाणून घेऊयात.

व्याजदर आणि गुंतवणूक कालावधी जाणून घ्या

सध्या म्युच्युअल फंडात एसआयपी (SIP) पद्धतीने गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवता येऊ शकतो. मात्र ही गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अंतर्गत आहे. एसआयपीमधील गुंतवणुकीचा कालावधी हा गुंतवणूकदार निश्चीत करू शकतात. किमान एक वर्ष ते जास्तीत जास्त कितीही वर्षासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. यामध्ये 12 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळवता येतो. निवडलेल्या फंडाने चांगली कामगिरी केल्यावर 12 टक्क्यांहून जास्तीचा व्याजदर देखील मिळण्यासाठी मदत होते.एसआयपीमध्ये दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक अधिक फायद्याची ठरते. 

पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेचा (Recurring Deposit Scheme) गुंतवणूक कालावधी 1,2,3 आणि 5 वर्षापर्यंत आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. आवर्ती ठेव योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी आहे. या योजनेत देखील गुंतवणूकदार मासिक आधारावर गुंतवणूक करू शकतो. आवर्ती ठेव योजनेत दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक अधिक फायद्याची ठरते. 

गुंतवणूक रक्कम जाणून घ्या

म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. पोस्टातील आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) गुंतवणूकदार किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. या योजनेत देखील कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.