एकामागून एक गोष्टी घडत आहेत. पहिले कोरनो आणि आता वाढलेली महागाई, त्यामुळे गुंतवणूक किती गरजेची आहे. याची प्रचिती सर्वांनाच आली आहे. त्यामुळे आता प्रत्येकजण फायनान्शिअल प्लॅनिंगच्या मागे लागला आहे. पण, योग्य ठिकाणी कॅल्क्युलेशन करुन गुंतवणूक केली तर फायदा होणार आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्लॅनिंग करायचे ठरवत असल्यास, आम्ही तुमच्यासाठी खास प्लॅन आणलाय. त्यानुसार गुंतवणूक केल्यास, तुम्हाला भविष्यात मुलांच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी करण्याची गरज भासणार नाही. तसेच, यासाठी तुम्हाला फक्त महिन्याला 5,000 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
SIP करेल मदत
तुम्ही SIP विषयी ऐकलेच असेल. SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडात सर्वात लोकप्रिय आहे. मार्केटच्या चढ-उतारवर SIP च्या सगळ्या गोष्टी अवलंबून असल्याने, व्याजदर कमी जास्त होऊ शकतो. पण, आपण SIP मध्ये गुंतवणूक करत असल्याने, रिस्क थोडी कमी राहते. कारण, SIP मध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करत असल्यास, यातून पैसे मिळण्याची हमी असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, SIP मध्ये गुंतवणूक केल्यास कपाउडींग इंटरेस्टचा लाभ मिळतो. त्यामुळे पैसे गुंतवल्यास तोटा होत नाही. तसेच, SIP मध्ये सरासरी 12 टक्के रिटर्न मिळतो. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करु शकता. यापेक्षा जास्त मिळाले तर तुमचे नशिब चमकायला वेळ लागणार नाही.
दीर्घ काळासाठी करा गुंतवणूक
तुमच्या घरी बाळ आलंय आणि तुम्ही तेव्हापासूनच त्याच्या नावाने 5,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली. तसेच, यामध्ये 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली. म्हणजे 20 वर्ष गुणीले 5,000 रुपये, जवळपास 12,00,000 लाखाची गुंतवणूक तुम्ही करणार. त्याचबरोबर 12 टक्क्यानेच व्याज धरल्यास, 37,95,740 पर्यंत ते जाईल. तुम्ही लावलेला पैसा आणि मिळालेले व्याज पाहिल्यास ते जवळपास 49,95,740 पर्यंत जाईल. म्हणजेच जवळपास तुम्हाला 50 लाख मिळतील. याचाच अर्थ 20 वर्षात तुम्ही लखपती व्हाल. फक्त नियमितरित्या तुम्हाला SIP भरावी लागणार आहे.
सोयीनुसार करा गुंतवणूक
तुम्ही एखाद्या तज्ज्ञांच्या मदतीने SIP मध्ये गुंतवणूक केल्यास फायद्यात राहाल. कारण, कोणाच्या सांगण्यावरुन किंवा ऐकीव माहितीवरुन गुंतवणूक केल्यास, आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्वत:ला गुंतवणूक करायची असल्यास, मार्केट रिसर्च करावा लागणार आहे. त्यामुळे तुमच्याजवळ वेळ असल्यास, तुम्ही या गोष्टी करु शकता. याचबरोबर एक प्लॅनिंग करुन गुंतवणूक केल्यास, मुलांचे शिक्षण, लग्न आणि इतर गोष्टींसाठी तुम्ही सहज पैसे जमा करु शकता. तसेच, तुम्ही तुमच्या सोयीनुसार SIP मध्ये गुंतवणूक करु शकता. फक्त योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि त्यात सातत्या या दोन गोष्टी केल्यास, तुम्हाला फायदाच होणार आहे.