सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) पद्धतीमध्ये बहुसंख्य लोक गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहेत. नियमित बचतीच्या दृष्टीने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा एक उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणुकीच्या या पद्धतीमुळे बचतीची सवय तर लागतेच सोबत सर्वाधिक परतावा देखील मिळतो. एसआयपी गुंतवणुकीचा हप्ता स्वयंचलित पद्धतीने तुमच्या बँक खात्यातून डेबिट (Auto Debit) केला जातो.
अनेक वेळा बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने हप्ता (Installment) चुकतो. पैसे नसल्याने पेमेंट केले जात नाही. अशा परिस्थितीत बँक आपल्याला डिफॉल्टर (Defaulter) म्हणून पाहते. बऱ्याच वेळा सतत डिफॉल्टर झाल्यामुळे बँक आपल्याला दंड देखील करते. या सर्व गोष्टीतून वाचायचे असेल आणि मासिक आधारावर एसआयपी चालू ठेवायची असेल, तर काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. त्या गोष्टी कोणत्या, जाणून घेऊयात.
एसआयपीचा हप्ता चुकू नये याकरिता 'या' गोष्टींकडे लक्ष द्या
तुम्ही देखील एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल, तर हप्ता ज्या तारखेला दिला जातो, त्यापूर्वी बँक खात्याकडे लक्ष ठेवा. बँकेत बॅलन्स कमी असेल, तर तात्काळ हप्त्याच्या रकमेची सोय करा.जेणेकरून तुम्ही पेमेंट डिफॉल्टर होणार नाही.
उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्यामुळे किंवा आर्थिक आणीबाणी आल्यामुळे किंवा इतर गरजांसाठी बऱ्याच वेळा पैसे खर्च केले जातात. गुंतवणूकदाराकडे एसआयपीचा हप्ता भरण्यासाठी रक्कम नसते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराने एसआयपी रद्द करण्याचा किंवा थांबवण्याचा निर्णय घ्यावा. बहुतांश एसआयपी फंड हाऊसेस (SIP fund houses) एसआयपी थांबवण्याचा किंवा तात्पुरता थांबवण्याचा पर्याय देतात. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील, तेव्हा तुम्ही तुमची एसआयपी पुन्हा सुरू करू शकता.
काही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये बदल करण्याचा पर्याय देखील देतात. त्याच्या मदतीने तुम्ही हप्त्याची रक्कम बदलू शकता. ती सहज कमी करता येते. ज्यामुळे हप्ता भरणे गुंतवणुकदाराला सोपे जाते.
बरेच म्युच्युअल फंड तुम्हाला हप्त्याची तारीख बदलण्याचा पर्याय देतात. जेणेकरून तुमच्याकडे मासिक आधारावर कोणत्या तारखेला पैसे येतात, हे समजून घेऊन तुम्ही त्यानुसार हप्त्याची तारीख ठरवू शकता.
एसआयपीचा हप्ता सतत चुकल्यास काय होईल?
तुमच्या एसआयपीचा हप्ता सलग 4 महिने चुकल्यास, तुमची एसआयपी रद्द केली जाऊ शकते. पूर्वी हा नियम 3 महिन्यांसाठी होता. मात्र आता या नियमात बदल करण्यात आला आहे. 4 महिन्यांसाठी सुधारित मुदत देण्यात आली आहे.
एसआयपी रद्द करणे म्हणजे तुम्ही त्या एसआयपीमध्ये यापुढे पैसे गुंतवू शकणार नाही. तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या मुदतपूर्तीनंतर तुम्ही ती रक्कम काढू शकता. यामुळे सुरुवातीच्या योजनेच्या तुलनेत गुंतवणूकदाराला कमी परतावा मिळण्याची शक्यता असते.
Source: hindi.news18.com