उद्याच्या उज्वल भविष्यासाठी आज केलेली आर्थिक गुंतवणूक मोठा फंड तयार करू शकते. सध्या आर्थिक गुंतवणुकीच्या अनेक योजना सक्रिय आहेत. बँकेतील मुदत ठेव योजना (Bank FD), पोस्ट ऑफिसमधील वेगवेगळ्या योजना (Post Office Scheme), म्युच्युअल फंड (Mutual Fund), एसआयपी (SIP), शेअर्स (Shares) किंवा विविध कंपन्यांचे बॉन्ड (Company Bonds) यामध्ये समाविष्ट आहेत.
सध्या बहुतांश लोक म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये किमान 12 ते 15 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. मात्र ही गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अंतर्गत येते. एसआयपीमध्ये मासिक आधारावर (Monthly Investment) गुंतवणूक करता येते. तुमच्याकडे एकरकमी पैसे नसतील, तर तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीवेळी लाखो रुपयांचा फंड तयार करू शकता. तो कसा, जाणून घेऊयात.
50 रुपयांची बचत मिळवून देईल लाखोंचा परतावा
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी दररोज 50 रुपयांची बचत तुम्हाला मोठा फंड तयार करण्यासाठी मदत करू शकते. तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत केली, तर मासिक तुमच्याजवळ 1500 रुपये जमा होतील. म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये मासिक 500 रुपये भरून गुंतवणूक सुरू करता येते. ही गुंतवणूक जितकी दीर्घकाळ असेल, तितका फायदा मिळतो.
1500 रुपये मासिक आधारावर गुंतवले आणि ही गुंतवणूक 5 वर्षासाठी केली, तर किमान 12 ते 15 टक्के व्याजदर तुम्हाला मिळणार आहे. 5 वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 12 टक्के व्याजदराच्या हिशोबाने 1,23,329 रुपये परतावा मिळेल. या पाच वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 90 हजार रुपये होईल. तर व्याज 33,329 रुपये होणार आहे. हे व्याजदर म्युच्युअल फंडाच्या बाजारातील स्थितीनुसार बदलू शकते.
जर तुम्हाला 5 वर्षात 15 टक्के व्याजदर मिळाले, तर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 1,33,830 रुपये परतावा मिळेल. तर पाच वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 90,000 रुपये होणार आहे. तर तुम्हाला 43,830 रुपये व्याजदर मिळणार आहे.