Shoppers Stop getting into mass price segment: बँडेड, क्वालिटी कपडे, दागिने, चपला आणि इतर ब्युटी प्रोडक्ट, मेकअप प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी अनेकांनी कधीना कधी शॉपर्स स्टॉपमध्ये स्टॉप घेऊन खरेदी केली आहे. येथील कपडे, वस्तू हे थोडे महाग मिळतात, ज्यामुळे या मॉडर्नट्रेड दुकानाकडे सर्वसामान्य नागरिकांचा कमी कल दिसून येतो. तर दुसरीकडे टाटा ग्रुपचे झुडियो आणि लँडमार्क ग्रुपचे मॅक्स फॅशन यांच्याकडे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक गर्दी करताना दिसतात, कारण येथे बजेट फ्रेंडली, क्वालिटी कपडे, इतर ट्रेंडी एक्सेसरीज मिळतात. आता यांच्या स्पर्धेत के. रहेजा ग्रुपच्या शॉपर्स स्टॉपने उडी घेण्याचे ठरवले आहे.
के. रहेजा ग्रुपचे डिपार्टमेंटल स्टोअर चेन शॉपर्स स्टॉप (Shoppers Stop) हे गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. त्यांचे तब्बल 40 शहरांमध्ये 126 मॉडर्नट्रेड स्टोअर आहेत. या स्टोअरद्वारे ते फॅशन आणि ब्युटी प्रोडक्टची विक्री करत आहे. हे श्रीमंत (Elite) व्यक्तींच्या गटापुरता मर्यादीत आहे, असे समजले जाते. हिच चौकट मोडण्यासाठी शॉपर्स स्टॉप व्हॅल्यू स्टोअर सुरू करणार आहे. ज्यात झुडियो आणि मॅक्ससारखे बजेट फ्रेंडली वस्तू मिळतील. या दुकानांमधील गर्दी; शॉपर्स स्टॉपच्या व्हॅल्यू स्टोअरकडे वळवण्यासाठी किंवा स्पर्धेत उतरण्यासाठी असे नियोजन करण्यात आले आहे.
करोनाचे निर्बंध उठल्यानंतरही शॉपर्स स्टॉपमधला फुटफॉल वाढला नाही, दुकानांमधील सामानांची विक्री फारशी झाली नाही. गेल्या तेरा महिन्यांपासून शॉपर्स स्टॉप तोट्यात सुरू आहे. करोना संपत असताना, ग्राहकांना शॉपिंगसाठी उद्युक्त करण्यासाठी अनेक ऑनलाईन कॅम्पेन राबवले गेले, मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. मागील चार महिन्यांपासून स्टोअर ऑपरेशनचा कॉस्ट कमी करण्यात आला आहे, नवा माल भरणे 9 टक्क्यांनी कमी झाले आहे. कॉस्ट कटींगसाठी स्टाफला कमी करण्यात आले आहे. कपड्यांवर तब्बल 800 ते 2 हजार 500 टक्के मार्जिन असले तरी त्यातून सर्व खर्च भागत नाही, त्यात प्रॉफीट ही दुरचीच गोष्ट आहे.
शॉपर्स स्टॉपला बुडण्यापासून वाचवण्यासाठी के. रहेजा ग्रुपमधील बिझनेस डेव्हल्पमेंट टीमने ब्रेन स्ट्रॉमिंग करून शॉपर्स स्टॉपला नव-संजिवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या फॅशन आणि ब्युटी कॅटगरीमधील मॉडर्न ट्रे़ड स्टोअरमध्ये झो़डियो आणि मॅक्स सर्वाधिक प्रॉफीट कमावणारे तसेच फुटफॉल असलेले ब्रँड्स आहेत. तर प्रॉफीट कमावण्यासाठी शॉपर्स स्टॉने या दोन ब्रँड्सना रोल मॉडेल म्हणून डोळ्यासमोर ठेवून काही नियोजन केले आहे, ही सर्व माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या स्पेशल इंडस्ट्री रिपोर्टमध्ये नमूद केलेली आहे.
शॉपर्स स्टॉपने काय नियोजन केले? What Shoppers Stop has planned
- जिथे झुडियो आणि मॅक्सचे स्टोअर आहेत, त्याच रांगेत व्हॅल्यू स्टोअर सुरू करणे
- टीयर 2 शहरांमध्ये 8 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करणे
- सर्व फॅशन आणि ब्युटीचे सामानाच्या किंमती झुडियो आणि मॅक्सच्या किंमतीएवढ्या रक्कमेने विकणे
- सर्वसामान्यांचा ब्रँड म्हणून विकसित करणे