Vineeta Singh Biography: आज विनिता सिंह या शुगर कॉस्मेटिक कंपनीच्या सीईओ आहेत. सोबतच त्या शार्क टॅंक इंडिया या रियालिटी शो च्या परिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत. या शो मुळे त्या प्रसिध्दीझोतात आल्या आहेत. नोकरी पासून ते कंपनीच्या सीईओ पर्यंतचा त्यांचा प्रवास पाहुयात.
Table of contents [Show]
बालपण (Childhood)
विनिता सिंह यांचा जन्म 1983 मध्ये दिल्लीत येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तेज सिंह आहे. त्यांनी दिल्ली येथील पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले असून त्यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी संपादन केली. पदवीनंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून येथून एमबीए पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एका ठिकाणी इंटर्नशीप केली.
करियर (Career)
दिल्लीत जन्मलेल्या विनिता सिंह यांनी प्रथम IIT मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि नंतर त्यांनी IIM अहमदाबादमधून एमबीए केले. त्या सुरुवातीपासूनच खूप मेहनती आणि हुशार होत्या. त्याची ही क्षमता ओळखून शिक्षकांनीही त्यांना बिझनेसमध्ये हात आजमावण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षण पूर्ण करून विनिता या मुंबईमध्ये आल्या. त्यावेळी त्यांना अनेक नोकरीच्या ऑफर आल्या, पण त्याने त्या सर्व फेटाळून लावल्या. एका इन्व्हेस्टमेंट बँकेची एक कोटी रुपयांची ऑफर ही त्यांनी नाकारली. तेही वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी. नोकरीची ऑफर स्वीकारण्यासाठी विनिता यांच्यावर खूप दबाव होता, त्यामुळे हा निर्णय त्यांच्यासाठी खूप कठीण होता. त्यांना माहित होते की, ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी रिस्क घेत आहोत. असे असूनही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही.
शुगर कॉस्मेटिक व्यवसायाची सुरूवात (Sugar Cosmetics Business Start)
विनिता यांनी पती कौशिक मुखर्जी यांच्यासोबत 2012 मध्ये शुगर कॉस्मेटिक्सची स्थापना केली. अखेरीस त्याचा नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य ठरला आणि 2019-20 या आर्थिक वर्षात त्यांच्या स्टार्टअपने 100 कोटींची कमाई केली. त्यावेळी दिग्गज उद्योजकांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झाला.
एकूण संपत्ती (Net Worth)
विनिता सिंग यांची अंदाजे 300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. डिसेंबर 2021 मध्ये भारतातील पहिल्या बिझनेस रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियामध्ये विनिता सिंगची निवड झाली. शार्क टँक इंडियाच्या प्रत्येक एपिसोडसाठी विनिता सिंह या पाच लाख रुपये मानधन घेतात.