Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shahrukh Khan Fees for Pathan: अबब! 'पठाण' चित्रपटासाठी शाहरूख खानने घेतली 'इतकी' रक्कम; तर सलमान खानने नाकारले मानधन!

Shahrukh Khan Fees for Pathan

Image Source : http://www.indiatoday.in/

Shahrukh Khan Fees for Pathan: बॉलीवूडमधील तगडे स्टार्स अभिनेता शाहरूख खान, जॉन अब्राहम व दिपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा प्रोमो, गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. आता या चित्रपटासाठी किंग खानने सर्वाधिक मानधन घेत असल्याचे सांगितले जात आहे.

Shahrukh Khan Fees for Pathan: ‘पठाण’ या चित्रपटाची चर्चा थांबता थांबेना. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच कोणत्या ना कोणत्या कारणाने हा चित्रपट वादग्रस्त ठरत आहे. आता या चित्रपटातील कलाकारांचे मानधन ऐकून तुम्ही व्हाल थक्क. ‘पठाण’ (Pathan) चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेऊन शाहरूख खान सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे. मग, या चित्रपटासाठी शाहरूख खानने नक्की घेतली फी घेतली आहे ही जाणून घेऊयात.

‘पठाण’साठी शाहरूख खानचे मानधन

बॉलीवूड बादशाह शाहरूख खान (Shaharukh khan) याचा चाहतावर्ग मोठा आहे. आता किंग खानने (King Khan) आपल्या आगामी चित्रपट पठाणसाठी मानधनामध्ये अभिनेता सलमान खान व आमिर खान याला ही मागे टाकले आहे. शाहरूखने या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रूपये फी आकारले असल्याचे सांगितले जात आहे. दिपिका पदुकोन (Deepika Padhukone) ने 15 कोटी रूपये, तर जॉन अब्राहमने (Jon Abraham) ने 20 कोटी रूपये घेतल्याचे समजत आहे. या तिन्ही कलाकारांनी तगडी रक्कम घेतली असल्याची चर्चा आहे.

सलमान खान ही दिसणार पठाण चित्रपटात 

शाहरूख खानचा कोणता ही चित्रपट असो, सलमान खान (Salman Khan) स्पेशल गेस्ट असणार ही आता रीतच झाली आहे. पठाण चित्रपटातदेखील सलमान खान झळकणार असल्याचे समजत आहे. मात्र या चित्रपटासाठी सलमान खानने कोणत्याही प्रकारचे मानधन घेण्यास नकार दिला आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक सिध्दार्थ आनंद याने या चित्रपटासाठी 6 कोटी रूपये इतके मानधन घेतले आहे. यापूर्वी सिध्दार्थने बॅंग बॅंग व वॉटरसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

शाहरूख खानचे 2023 मध्ये होणार 3 चित्रपट प्रदर्शित

किंग खान  शाहरूख खानच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पठाणसह शाहरूख खानचे 2023 मध्ये  आणखी 2 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावर्षी जूनमध्ये ‘जवान’ व डिसेंबरमध्ये राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘डंकी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चार वर्षांनंतर शाहरूख खानचा पठाण हा चित्रपट येत आहे. त्यामुळे एसआरके (SRK) चा  चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी आलेला शेवटचा चित्रपट झिरो बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यास अयशस्वी झाला होता. त्यामुळे शाहरूखचा आगामी चित्रपट पठाण किती कमवितो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.