Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shahrukh Khan Richest Rank in Celebrities: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरूख खान चौथ्या नंबरवर

Shahrukh Khan Richest Rank in Celebrities

Image Source : http://india.postsen.com/

Shahrukh Khan: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बॉलीवुडचा किंग खान शाहरूख खान हा चौथ्या क्रमाकांवर आहे. या अभिनेत्याने अनेक हाॅलिवुड कलाकरांना मागे टाकले आहे. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊयात.

Shahrukh Khan Latest News: गेल्या 3 दशकांपासून भारतातील प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा अभिनेता शाहरूख खान याचे नाव सर्वात श्रीमंत सेलेब्रिटिज् च्या यादीत समावेश करण्यात आले आहेत. बॉलीवुडचा बादशाह याने चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खान हा ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आला आहे. या चित्रपटातील गाणी, वादग्रस्त काॅश्च्युम, बॉयकॉट पठाण, बॉयकॉट शाहरूख असा ट्रेण्ड देखील पाहायला मिळाला. अशा या बॉलिवुडच्या रोमॅण्टिक हिरोने श्रीमंतीच्या बाबतीत जगातील सर्व कलाकारांना मागे टाकत, चौथे स्थान पटकविले आहे.

कोणते हाॅलिवुड कलाकर (Hollywood Celebrities)

शाहरूख खानला बॉलीवूडचा किंग खान उगाचं म्हणत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे, सध्या ट्विटवर व्हायरल होत असलेलं एक ट्विट...या व्हायरल ट्विटमध्ये सांगण्यात आले की, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरूख खान चौथ्या नंबरवर असून, त्याने जॉर्ज क्लूनी, जॅकी चॅन आणि टॉम क्रूझ यांनादेखील मागे टाकले आहे.

शाहरूख खानची संपत्ती (Shah Rukh Khan's wealth)

गेल्या अनेक दशकांपासून शाहरुख खान प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीनुसार शाहरुख खानची संपत्ती 770 मिलियन डॉलर म्हणजेच 6306 कोटी एवढी आहे. या यादीत शाहरुख खानने टॉम क्रुज, जॅकी चॅन, जॉर्ज क्लूनी, रॉबर्ट डी नेरोसारख्या प्रसिद्ध कलाकारांनादेखील मागे टाकले आहे.

पठाण चित्रपटाबाबत...(Pathan Movie)

सध्या पठाण या चित्रपटाचा टेंड सुरू आहे. या चित्रपटात शाहरूख खान, दिपिका पदुकोन (Deepika Padukon) व जाॅन अब्राहिम मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी सोशलमिडीयावर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान साधारण चार वर्षांनंतर पठाण, जवान आणि डंक या तीन चित्रपटाव्दारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.