सलग दोन सत्रातील तेजीनंतर आज शेअर मार्केटमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली होती मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही. दोन्ही निर्देशांक घसरले. सेन्सेक्समध्ये 170 अंकांची घसरण झाली होती. निफ्टी 18133 अंकांवर ट्रेड करत आहे.
आजच्या सत्रात बँका, मेटल, आयटी, रिअल इस्टेट या क्षेत्रात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर 30 पैकी 18 शेअर घसरले आहेत. त्यात एचयूएल, एचडीएफसी बँक, कोटक बँक, नेस्ले, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, विप्रो, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस या शेअरमध्ये घसरण झाली. पॉवरग्रीड, एनटीपीसी, टायटन, इंड्सइंड बँक, महिंद्रा अॅंड महिंद्रा, एशियन पेंट्स, एचडीएफसी, एलअॅंडटी, सन फार्मा, बजाज फायनान्स या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
निफ्टीमध्ये आज सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी आयटी, निफ्टी मिडिया, निफ्टी फार्मा या इंडेक्समध्ये घसरण झाली.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समधील घसरण कायम आहे. आज पर्सिस्टंट सिस्टम, एलटीआय माईंडट्री, टाटा एल्क्सी, एल अॅंड टी टेक्नॉलॉजीस, इन्फोसिस, एम्फासिस, झेंसर टेक्नॉलॉजी, टीसीएस, ओरॅकल फायनान्शिअल या शेअरमध्ये घसरण झाली. आज अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये 2.20% वाढ झाली.
एफएमसीजी शेअर्समध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला
आजच्या सत्रात एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे दिसून आले. एफएमसीजी क्षेत्रातील फ्युचर कन्झु्मर, गोदरेज कन्झुमर, ब्रिटानिया, मेरिको, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज कन्झुमर, जिलेट इंडिया, हॅटसन अॅग्रो, कोलगेट पामोलिव्ह इंडिया, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली.