Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) – जाणून घ्या तपशील, फायदे, व्याजदर व खाते उघडणे

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) – जाणून घ्या तपशील, फायदे, व्याजदर व खाते उघडणे

Image Source : www.valueresearchonline.com

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) 2022 ची वैशिष्ट्ये, खाते सुरू करण्यासाठी काय नियम आहेत, व्याज किती मिळते, याची माहिती घेणार आहोत.

पेन्शन आणि व्याज यातून मिळणारे उत्पन्न हेच वार्षिक उत्पन्नाचे स्रोत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. पेन्शन आणि बँकेकडून मिळालेले व्याज हेच वार्षिक उत्पन्न असलेल्या 75 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवरील टॅक्स / कर कपात करण्यासाठी कायद्यात कलम 194P नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) ही प्रामुख्याने भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. ही योजना सुरक्षिततेसह कर बचतीच्या लाभासह नियमित उत्पन्नाचा स्त्रोत आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी ही गुंतवणुकीसाठी चांगली योजना आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) योजना काय आहे?

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही सरकारद्वारे चालवली जाणारी सेवानिवृत्तीची योजना आहे. भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक वैयक्तिकरित्या (Individual) किंवा संयुक्तपणे (Jointly) या योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकतात आणि कर सवलतीसह नियमित उत्पन्न मिळवू शकतात.

पोस्टाची सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्किम (SCSS) काय आहे?

पोस्टाच्या विविध योजनांपैकी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही एक बचत योजना आहे. ज्याप्रमाणे बॅंकेत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते उघडता येते, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये ही असे खाते उघडता येते. पोस्टाच्या विविध बचत योजनांप्रमाणे, सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्किमचे खाते उघडण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेला भेट देऊ शकता. खाते उघडण्यापूर्वी पात्रता निकष आणि योजनेची वैशिष्ट्ये तपासा.

SCSS खाते म्हणजे काय?

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) खाते हे सेवानिवृत्तीचे फायदे देणारे आणि सरकारने पुरस्कृत केलेले खाते आहे. भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक वैयक्तिकरित्या (Individual) किंवा संयुक्तपणे (Jointly) या योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकतात आणि कर सवलतीसह नियमित उत्पन्न मिळवू शकतात.

SCSS अंतर्गत ज्येष्ठ नागरिक किती खाती उघडू शकतात?

या योजने अंतर्गत एकापेक्षा जास्त खाती उघडता येऊ शकतात. पण सर्व खात्यांमधील एकूण ठेवी कमाल मर्यादेपेक्षा अधिक म्हणजे 15 लाखांपेक्षा अधिक असता नये. तसेच एका महिन्यात एकाच शाखेत एकापेक्षा जास्त खाती उघडता येत नाहीत.

SCSS मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?

खालील अटींची पूर्तता करणारा कोणताही भारतीय निवासी SCSS मध्ये गुंतवणूक करू शकतो.

  • 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले भारतातील ज्येष्ठ नागरिक
  • ज्यांचे वय 55 ते 60 या दरम्यान असून त्यांनी स्वेच्छेने सेवानिवृत्ती (VRS) निवडली
  • 50 वर्षांवरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी
  • हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि अनिवासी भारतीय (NRI) यांना यात गुंतवणूक करण्याची परवानगी नाही
  • सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत गुंतवणूक करणे आवश्यक

SCSS अंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवता येते?

सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्किमद्वारे (SCSS) जास्तीत जास्त 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

SCSS चा सध्याचा व्याजदर किती आहे?

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (SCSS) सध्या वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळते. हा व्याजदर 31 मार्च, 2022 पर्यंतचा आहे.