डिमॅट खातेदारांना कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागू नये यासाठी सेबी नेहमीच तत्पर राहते. याचाच एक भाग म्हणून सेबीने विद्यमान खातेदारांना नॉमिनेशनचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी किंवा डिक्लेरेशन फॉर्मद्वारे औपचारिकरित्या नॉमिनेशनमधून बाहेर पडण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवून 31 डिसेंबरपर्यंत केली आहे. त्यामुळे खातेदारांना आता अजून तीन महिन्यांची मुदत मिळाली आहे.
या कारणांसाठी नाॅमिनी आवश्यक
याशिवाय, बिझनेस करायला सोपे जावे म्हणून सेबीने ट्रेडिंग खात्यांसाठी 'चॉईस ऑफ नॉमिनेशन' सादर करणे पर्यायी ठेवले आहे. यापूर्वी विद्यमान पात्र ट्रेडिंग आणि डिमॅट खातेदारांना 30 सप्टेंबरपर्यंत नॉमिनेशन करायची मुदत दिली होती.
तसेच, हा निर्णय घेणे म्हणजे गुंतवणुकदारांना त्यांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना देण्यास मदत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सेबीने त्यांच्या निवेदनात म्हटले की, डिमॅट खात्यांबाबत 'चॉईस ऑफ नॉमिनेशन' सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑफलाईनसाठी मुदत सारखीच
याशिवाय सेबीने ऑफलाईन किंवा फिजिकल सिक्युरिटी धारकांना पॅन, नाॅमिनेशन, फोन नंबर, बॅंक खात्याचे डिटेल्स आणि संबंधित फोलिओ नंबरसाठी स्वाक्षरी जमा करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
जुलै 2021 पासून होतीये मुदतवाढ
सेबीने जुलै 2021 मध्ये, सर्व विद्यमान पात्र ट्रेडिंग आणि डिमॅट खातेदारांना 31 मार्च 2022 पर्यंत चॉईस ऑफ नॉमिनेशनचा पर्याय देण्यास सांगितले होते. त्यानंतर ही मुदत आणखी एका वर्षाने वाढवून 31 मार्च 2023 आणि पुन्हा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्यात आली होती. आता पुन्हा ती तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे.