Cashback SBI Card : जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. यातून तुमची चांगली बचत होऊ शकते. ही संधी स्टेट बॅंक इंडिया (State Bank of India)ने आणली आहे. एसबीआयने कॅशबॅक क्रेडिट कार्ड (Cashback Credit Card) लॉन्च केले असून, या कार्डद्वारे ऑनलाईन शॉपिंगवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे. तसेच या कार्डमध्ये ऑटो-क्रेडिट कॅशबॅकची सुविधा असल्याने दोन दिवसांत कॅशबॅक जमा होईल.
एसबीआय कार्ड (SBI Card)चा असा दावा आहे की, कॅशबॅक एसबीआय कार्ड (Cashback SBI Card) हे देशातील पहिले असे कार्ड आहे. ज्याद्वारे कार्डधारकाला खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. एसबीआयचे हे Cashback SBI Card कॉन्टॅक्टलेस कार्ड असून वायफायद्वारे यातून ट्रॉन्सॅक्शन करता येणार आहे.
कॅशबॅक एसबीआय कार्डचे फायदे!
एसबीआय कार्डच्या मते, कॅशबॅक एसबीआय कार्डच्या ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर कोणत्याही मर्यादेशिवाय 1 टक्के कॅशबॅक मिळणार असून कार्डधारकाने 10 हजारांपर्यंत खरेदी केल्यास त्याला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदीवर कोणतेही निर्बंध नाहीत. ही सुविधा सर्व प्रकारच्या खरेदीवर लागू आहे.
Cashback SBI कार्डधारकांसाठी खास ऑफर!
कॅशबॅक एसबीआय कार्डधारकाला प्रत्येक वर्षी डोमेस्टिक एअरपोर्टवरील लाऊंजमध्ये 4 वेळा मोफत राहण्याची संधी मिळणार आहे. याचा लाभ प्रत्येकी 3 महिन्यातून एकदा घेता येणार आहे. तसेच या कार्डवर 1 टक्का इंधन अधिभार परतावा (Fuel Surcharge Refund)चा फायदासुद्धा मिळणार आहे. पण हा फायदा मिळवण्यासाठी कार्डधारकाला 500 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करावे लागणार आहेत. एसबीआय कार्डने अधिभार परताव्याची मर्यादा 100 रुपये ठेवली आहे. त्यामुळे कार्डधारकाला महिन्याभरात 100 रुपयांपर्यंच इंधन अधिभारची सवलत मिळू शकणार आहे.
कार्डची वार्षिक फी!
कॅशबॅक कार्डचे नुतनीकरण करण्यासाठी कार्डधारकाला वार्षिक फी (Annual Charges) भरावी लागणार आहे. यासाठी वार्षिक फी 999 रुपये निश्चित केली असून त्यावर टॅक्ससुद्धा आकारला जाणार आहे. एखाद्या कार्डधारकाने एका वर्षात 2 लाखांपर्यंत खरेदी केली तर त्या कार्डधारकाची वार्षिक फी पुन्हा दिली जाईल, असे बॅंकेने म्हटले आहे. Cashback SBI Card विसा (VISA) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. जे ग्राहक विशेष ऑफर अंतर्गत मार्च 2023 पर्यंत कार्ड मेंबरशीप घेतील त्या कार्डधारकांकडून वर्षभरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.