Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Payment करण्यासाठी SBI ने आणली नवी सेवा, सर्व बँकेचे खातेदार करू शकतील पेमेंट! GPay, Paytm ला तगडे आव्हान!

UPI Payment करण्यासाठी SBI ने आणली नवी सेवा, सर्व बँकेचे खातेदार करू शकतील पेमेंट! GPay, Paytm ला तगडे आव्हान!

डिजिटल बँकिंग ॲप SBI YONO द्वारे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI Payment) वापरण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आली होती. सुरुवातीला केवळ SBI बँकेच्या ग्राहकांसाठी मर्यादित असलेली ही सुविधा आता अन्य बँकेचे ग्राहक देखील वापरू शकणार आहेत अशी माहिती स्वतः बँकेनेच दिली आहे.

युपीआय पेमेंट आता सर्वांच्याच सवयीचे झाले आहे. अगदी 10-20 रुपयांचे पेमेंट करायचे झाले तरी लोक UPI वापरताना दिसतात. सध्या UPI पेमेंट सुविधा देण्यासाठी देशभरात वेगवगेळ्या टेक कंपन्या कार्यरत आहेत. जीपे, पेटीएम ही काही आघाडीची नावे सांगता येतील. या कंपन्यांना आता तगडी टक्कर देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मैदानात उतरली आहे.

SBI ने सुरु केली UPI पेमेंट सेवा 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी आणि महत्वाची बँक आहे. या बँकेचे देशभरात कोरोडो ग्राहक आहेत. SBI ने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ग्राहकांना UPI सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. डिजिटल बँकिंग ॲप SBI YONO द्वारे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI Payment) वापरण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आली होती. सुरुवातीला केवळ SBI बँकेच्या ग्राहकांसाठी मर्यादित असलेली ही सुविधा आता अन्य बँकेचे ग्राहक देखील वापरू शकणार आहेत अशी माहिती स्वतः बँकेनेच दिली आहे.

टेक कंपन्यांना पर्याय 

सायबर चोरीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे सुरक्षित आर्थिक व्यवहारासाठी ग्राहक आजही बँकेचे मोबाईल ॲप वापरताना दिसतात. ICICI बँकेने याआधीच UPI स्कॅनरची सुविधा त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. SBI ने सुरु केलेले ॲप मात्र इतर बँकेच्या ग्राहकांना देखील वापरता येणार आहे हे विशेष. इतर बँकेच्या ग्राहकांना देखील आकर्षित करण्यासाठी SBI ने ही सुविधा देऊ केली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सध्या मार्केटमध्ये जीपे, पेटीएम सारख्या अन्य टेक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या बँकिग सुविधा देत असल्या तरी त्या थेट बँकिग विषयी प्रश्न हाताळत नाही. काही पेमेंटमध्ये अडचणी आल्यास किंवा अतिरिक्त पैसे कापले गेल्यास या टेक कंपन्या ग्राहकांना त्यांच्या बँकेत जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे तसेही सामान्य युजर्सला अशा अडचणींचा सामना करावा लागत होता. आता मात्र थेट बँकच या व्यवहारात लक्ष देणार असल्यामुळे सामान्य नागरिक या सुविधेचा अधिकाधिक फायदा घेतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

यूपीआय पेमेंटसाठी योनो कसे वापराल?

1. यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये SBI Yono ॲप डाउनलोड करा.
2. यानंतर New to SBI चा पर्याय निवडा आणि नोंदणी करा.
3. पुढे, बँक खात्यासह तुमच्या मोबाईल नंबर टाका.
4. यानंतर, मोबाईल नंबरची पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला तुमचा UPI आयडी तयार करावा लागेल.
5. UPI आयडी तयार झाल्यानंतर तुमच्या बँकेचा पर्याय निवडा.
6. त्यानंतर तुम्हाला SBI Pay वर नोंदणी करावी लागेल, ज्याची तुम्हाला पडताळणी करावी लागेल.
7. यानंतर तुम्हाला UPI हँडल निवडावे लागेल 
8. नंतर तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि MPIN सेट करा.
9. MPIN सेट केल्यानंतर, तुम्ही UPI पेमेंटसाठी SBI YONO वापरू शकता.