मोटार विमा पॉलिसी ही आजच्या काळातील महत्वाची अशी बाब आहे. मोटार विमा नसेल तर ट्रॅफिक पोलीस तुम्हांला दंड देखील ठोठावू शकतात हे लक्षात असू द्या. जर तुमच्या वाहनाची विमा पॉलिसी मुदत संपली असेल आणि तुम्ही पॉलिसी नूतनीकरण करायचा विचार करत असाल तर हा लेख नक्की वाचा. पॉलिसीचे नुतनीकरण करताना जर काही टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या पैशांची नक्कीच बचत होऊ शकते.
वाहन पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण केल्यास तुम्हांला काही फायदे मिळू शकतात. आता तर मोबाईलवरच तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पॉलिसी काढू शकतात. हे काम आता पहिल्यापेक्षा अधिक सोपे आणि जलद झाले आहे. वाहन पॉलिसी घेताना किंवा तिचे नूतनीकरण करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
पॉलिसी डॉक्युमेंट
विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्यापूर्वी, नेहमी पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे वाचायला हवीत. विशेषत: छोट्या अक्षरात दिलेली माहिती तर वाचलीच पाहिजे. तसेच कागदपत्रे आणि कंपनीची वेबसाईटवर या दोघांनाही नजरेखालून घाला. अनेकदा पॉलिसी घेतल्यानंतर जर कंपनीने पॉलिसीत बदल केले असतील तर नूतनीकरण करताना त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. तसेच पॉलिसीधारकांना फायद्याच्या अशा काही अतिरिक्त सवलतींची माहिती वेबसाइटवर असू शकते. अशा प्रकारे नवनवीन ऑफर्सचा लाभ घेऊन आपण आपला प्रीमियम कमी करू शकतो आणि पैश्यांची बचत करू शकतो.
पॉलिसीबद्दल सर्वकाही जाणून घ्या
मोटार इन्शुरन्सचे ऑनलाइन नूतनीकरण करण्यापूर्वी, आधीपासून तुम्ही काढलेल्या पॉलिसीचा अभ्यास करा. त्यात दिलेले मुद्दे लक्षपूर्वक वाचून काढा. कारण तुमच्या मागील पॉलिसीमध्ये काही अतिरिक्त कव्हरेज घेतले गेले असतील, ज्याचा तुम्हांला काहीही उपयोग नाही, असे कव्हरेज पर्याय तुम्ही वगळू शकता.
मार्केटिंगचा फंडा म्हणून पॉलिसी कंपन्या आपल्याला वेगवेगळ्या ऑफर्स, कव्हरेज सांगत असतात, परंतु आवश्यकता असेल तरच असे कव्हरेज घ्यायला हवे. यामुळे पैशांची बचत नक्कीच होईल.
नो क्लेम बोनस
ज्या पॉलिसीधारकांनी पॉलिसी काळात कंपनीकडे कोणतेही दावे दाखल केले नाहीत असे ग्राहक विमा कंपनीकडून नो क्लेम बोनससाठी (No Claim Bonus) पात्र आहेत. मोटार विमा नूतनीकरणाच्या वेळी बहुतेक पॉलिसीधारकांना प्रीमियममध्ये सूट दिली जाते.
A No-Claim Bonus or NCB is a discount offered on premium by the Insurer if a vehicle has not made any claim during the motor insurance policy’s term.
— InsureKraft (@insurekraft) April 1, 2023
Follow @insure_kraft to learn about such concepts relating to Motor Insurance.#Insurance #claim #noclaimbonus #policy pic.twitter.com/KqW2vXAmV3
मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण आवश्यक
मोटार विमा नूतनीकरणासाठी पाळला जाणारा आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे पॉलिसीधारकांनी पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी तिचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी एक किंवा दोन महिने आधी वाहनाचे नूतनीकरण करणे कधीही फायद्याचे ठरू शकते.
काही विमा कंपन्या त्यांच्या जुन्या ग्राहकांना वेगवेगळ्या सवलती देखील देत असतात. त्यामुळे मुदत संपण्याच्या आधी विमा नूतनीकरण केल्यास फायदा होऊ शकतो.
वाहनाच्या आवश्यकतेनुसार पॉलिसी
वाहन घेऊन किती महिने, किती वर्षे झाली आहेत यावर देखील तुमची पॉलिसी आणि त्याचे प्रीमियम ठरतात. नवीन वाहनांना काही कव्हरेजची आवश्यकता नसते. तसेच वाहनाचा वापर तुम्ही किती आणि कुठे करता याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. म्हणजेच जर तुम्ही केवळ घराच्या आसपास येण्याजाण्यासाठी जर वापरत असाल तर बेसिक विमा घेतला तरी चालेल. नको ते कव्हरेज घेणे अशा प्रकरणात टाळता येऊ शकते.
पर्यायांचा अभ्यास करा
मोटार विमा नूतनीकरणासाठी ही एक महत्वाची पायरी आहे. ज्या कंपन्या जास्तीत जास्त फायदा, सवलती, ऑफर्स देत असतील अशाच कंपन्यांचा विमा घेणे कधीही चांगले. उगाच कव्हरेजच्या, सुविधेच्या नावाखाली भरमसाठ पैसे भरून विमा काढणे नुकसानीचे ठरू शकते. त्यामुळे मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांचा अभ्यास करा आणि ज्या कंपन्या अधिक फायदा देत असतील त्याच कंपनीचा विमा काढून घ्या.