सिने अभिनेता हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. कोरोना काळात सोनू सूद याने आपल्या सूद चॅरिटी फाऊंडेशनच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या अनेक भारतीयांना जमेल तशी मदत केली आहे. सूद चॅरिटीच्या (sood charity foundation) माध्यमातून विविध समाजपयोगी प्रकल्पावर काम सुरू आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात देखील संस्थेकडून काम करण्यात येत आहे. या माध्यमातून सूद चॅरिटीने 2023-24 मध्ये विद्यार्थ्यांना वकील होण्यासाठी मोफत कोचिंग सुरु करण्याचा संकल्प (SANKALP) केला आहे.
चला तुम्हाला वकील बनवतो...
सूद चॅरिटी (sood charity foundation) ही अभिनेता आणि समाजसेवक, सोनू सूद यांनी स्थापन केलेली एक एनजीओ आहे. या संस्थेच्या माध्यमातून सोनू सूद यांनी देशातील आर्थिकदृष्ट्या मागास, तसेच कोरोना आपत्तीकाळात पालक गमावलेले अनाथ विद्यार्थी यांना चांगले शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्प प्रोग्राम अंतर्गत सूद फाऊंडेशनने जे विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी मोफत शिक्षण दिले जाणार आहे. या संदर्भात सोनू सूद यांनी 'चला तुम्हाला वकील बनवतो' अशा आशयाचे एक ट्विट करून संकल्प या कार्यक्रमा विषयी माहिती दिली आहे.
काय आहे संकल्प?
सूद चॅरिटी फाऊंडेशनच्या वतीने विधी शिक्षण घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना CLAT, AILET आणि इतर कायद्याच्या प्रवेश परीक्षांसाठी मोफत शिकवणी क्लासेस दिले जाणार आहेत. त्यासाठी 'संकल्प2023-24' (SANKALP) हा एक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामाध्यमातून व्यावसायिक विधी शिक्षण घेण्यास आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम होण्यास मदत केली जाणार आहे. हा प्रिशिक्षण प्रोग्राम सूद चॅरिटी आणि प्राध्यापक राजेश यांची कोचिंग संस्था VPROV यांच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येणार आहे.
काय आहेत निकष?
सूद चॅरिटीच्या मोफत संकल्प विधी शिक्षण 2023-24 या प्रोग्रामसाठी काही नियम अटी निश्चित करण्यात आले आहेत. या नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या संकल्प प्रोग्रामचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणसाठी सूद चॅरिटीच्या संकेतस्थळावर अर्ज करावा. (SANKALP 2023-24 LINK)
- संकल्प LAW प्रशिक्षणासाठी 12वी उत्तीर्ण, किंवा 11 वी, 12 वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र ठरतील
- कोविड काळात जे विद्यार्थी अनाथ झाले त्यांना प्राधान्य दिले जाईल.
- कोविड पीडित असल्याची पडताळणी केल्यानंतरच मोफत LAW प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लॉ विषयक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
- तुमच्या नावाची नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लॉ एंट्रन्स कोचिंगसाठी प्रवेश मिळेल याची हमी नाही.
- सूद फाऊंडेशन आणि प्राध्यापक राजेश यांची कोचिंग संस्था VPROV यांना आवश्यक असलेली कागदपत्रे देणे अनिवार्य
- तसेच विद्यार्थ्याने चुकीची माहिती दिल्यास निवड त्वरित रद्द केली जाईल.
- या तिमाहीत होणाऱ्या निवड होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची बॅच ऑक्टोबरमध्ये सुरू होईल