Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Galaxy Unpacked 2023: Samsung च्या मेगा इव्हेंटची तारीख निश्चित, Galaxy S23 सीरिज होणार लॉन्च

Galaxy Unpacked 2023

Image Source : www.elrincondechina.com

Galaxy Unpacked 2023 : या सीरिजच्या Galaxy S23 आणि Galaxy S23+ सह 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. Galaxy S23 Ultra 12 GB रॅम आणि 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज मॉडेलमध्ये देऊ शकतो. .

या सीरिजच्या Galaxy S23 आणि Galaxy S23+ सह 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते.  Galaxy S23 Ultra 12 GB रॅम आणि 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज मॉडेलमध्ये देऊ शकतो. Samsung Galaxy S23 सीरिजच्या  लॉन्च तारखेबाबत लिक झालेल्या अहवालातून माहिती पुढे आली आहे. Galaxy Unpacked 2023 इव्हेंटबाबत सॅमसंगकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

असे म्हटले जात आहे की,  Galaxy Unpacked इव्हेंट 2023 हा  1 फेब्रुवारी 2023 रोजी होईल. यामध्ये Samsung Galaxy S23 सीरिज लॉन्च केली जाईल. Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra फोन या सीरीज अंतर्गत लॉन्च केले जातील. याआधीही  सॅमसंगने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट आयोजित केला आहे.सॅमसंगच्या कोलंबिया वेबसाइटवर गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटचे प्रमोशनल पोस्टर दिसले आहेत, असे 9to5google ची माहिती आहे. Galaxy S23 सीरिजमधील सर्व फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह तीन रियर कॅमेरे मिळतील.  Galaxy S23 Ultra मध्ये 200 मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह चार मागील कॅमेरे मिळू शकतात.

या सीरिजच्या Galaxy S23 आणि Galaxy S23+ सह 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते, तर Galaxy S23 Ultra 12 GB रॅम आणि 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज मॉडेलमध्ये देऊ शकतो. .Galaxy S23 आणि Galaxy S23 Ultra हे बोटॅनिक ग्रीन, कॉटन फ्लॉवर, फँटम ब्लॅक शेड्समध्ये दिले जाऊ शकतात. सॅमसंग गॅलेक्सी S23 सीरीजच्या फोनच्या किंमती Galaxy S22 सीरीज सारख्याच असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.