Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Samsung Galaxy Z Fold 5 Sale: सॅमसंग गॅलक्सी Z फोल्ड 5 स्मार्टफोन अखेर बाजारात दाखल, किंमत वाचून व्हाल थक्क!

Samsung Galaxy Fold 5

Image Source : www.gadgets360.com

Samsung Galaxy Z Fold 5 Sale: गेल्या महिन्यात सॅमसंगकडून गॅलक्सी झेड फोल्ड 5 आणि गॅलक्सी झेड फ्लिप 5 हे दोन स्मार्टफोन लॉंच केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन गेल्या आठवडाअखेरीस भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले.

सॅमसंगचा बहुचर्चित गॅलक्सी झेड फोल्ड 5 या स्मार्टफोन अखेर मार्केटमध्ये दाखल झाला आहे. फोल्डेबल फोनच्या श्रेणीतील हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. भारतात सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 5 ची किंमत 1 लाख 54 हजार 999 रुपये इतकी आहे. गॅलक्सी झेड फ्लिप 5 ची किंमत 99 हजार 999 रुपयांपासून आहे.

गेल्या महिन्यात सॅमसंगकडून गॅलक्सी झेड फोल्ड 5 आणि गॅलक्सी झेड फ्लिप 5 हे दोन स्मार्टफोन लॉंच केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन गेल्या आठवडाअखेरीस भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले.

गॅलक्सी झेड फोल्ड 5 आणि गॅलक्सी झेड फ्लिप 5 या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 मोबाईल प्लॅटफॉर्म आहे. यात वन यूआय 5.1.1 या अ‍ॅंड्राईड 13 चा समावेश आहे. हे दोन्ही मॉडेल मेड इन इंडिया असून सॅमसंगच्या नोएडा फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आले आहेत.

सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 5 चे 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज क्षमता असेलेल्या मॉडेलची किंमत 1 लाख 54 हजार 999 रुपये इतकी आहे. 512 जीबी आणि 1 टीबी स्टोरेज असलेल्या सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 5 ची किंमत 1 लाख 64 हजार 999 रुपये इतकी आहे. हा फोन क्रिम, आईस ब्ल्यू आणि फॅंटम ब्लॅक रंगात उपलब्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिप 5 चे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या स्मार्टफोनची किंमत 99 हजार 999 रुपये इतकी आहे. यातील टॉप व्हेरिएंटची किंमत 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजची किंमत 1 लाख 9 हजार 999 रुपये इतकी आहे. हा फोन क्रिम, ग्राफाईट, लव्हेंडर आणि मिंट शेड्स अशा रंगसंगतीत उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 5मध्ये 7.6 इंचाचा डायनॅमिक अ‍ॅमोलाइड डिस्प्ले आहे. गॅलक्सी झेड फोल्डमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा असून तो 50 मेगापिक्सेल वाइड अ‍ॅंगेल कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. इतका आहे. यात 4400 mAh बॅटरी आहे.

सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिप 5 मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा आहे. 12 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सॉर आणि 12 मेगापिक्सेल वाइड अ‍ॅंगल कॅमेरा आहे. यात 10 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असून यातून व्हिडिओ कॉलचा आनंद घेता येईल.

ऑनलाईन खरेदीवर  9000 रुपयांचा डिस्काउंट आणि ऑफर्स

सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 5 आणि गॅलक्सी झेड फ्लिप 5 हे दोन्ही स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. त्याशिवाय सॅमसंगच्या अधिकृत विक्रेत्यांकडे हे लेटेस्ट स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. अ‍ॅमेझॉनवर सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 5 वर 9000 रुपयांचा तरगॅलक्सी झेड फ्लिप 5 7000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. एचडीएफसी क्रेडीट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर दोन्ही फोन्सवर तात्काळ 8000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.