Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Salman Khan: भाईजानही आता रिअल इस्टेट क्षेत्रात, महिन्याला मिळणार एक कोटी भाडं

salman khan in real estate business

Image Source : www.twitter.com/BeingSalmanKhan

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आता रिअल इस्टेट क्षेत्रात उतरला आहे. आपली सांताक्रूझ इथली एक प्रॉपर्टी सलमानने भाडेतत्वावर देऊ केली आहे. विशेष म्हणजे सलमानला दरमहा एक कोटी इतकी प्रचंड रक्कम भाडं म्हणून मिळणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता रिअल इस्टेट क्षेत्रातही दबंगगिरी करताना पाहायला मिळणार आहे. सलमानने आपली सांताक्रूझ इथली एक अपार्टमेंट भाडेतत्वावर दिली आहे. लँडक्राफ्ट रिटेल प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने सलमान खानशी एक करार केला आहे. या कराराअंतर्गत त्यांनी सलमान खानची ही अपार्टमेंट भाड्याने घेतली आहे.

कशी आहे सलमान खानची ही अपार्टमेंट?

भाईजानची ही अपार्टमेंट थोडीथोडकी नाही तर तब्बल 2 हजार 140 स्वेअर मीटर इतकी मोठी आहे. या प्रॉपर्टीला सलमानने 2012 साली विकत घेतलं होतं. या प्रॉपर्टीत एक भूमिगत मजला(Lower Ground Floor), तळमजला(Ground Floor),पहिला मजला (First Floor) आणि दुसरा मजला(Second Floor) आहे. सलमानने हे चारही मजले लँडक्राफ्ट रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देऊ केले आहेत.

दर महिना किती असेल भाडं?

आता इतकी मोठी प्रॉपर्टी आणि तीही सांताक्रूझसारख्या उच्चभ्रू परिसरात असेल तर त्याचं भाडंही तितकंच महाग असेल यात शंकाच नाही. भाईजानच्या या अपार्टमेंटला लँडक्राफ्ट रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दरमहा एक कोटी रुपये भाडं देणार आहे. लँडक्राफ्ट रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 5.4 कोटी रुपये आगाऊ रक्कम म्हणून देऊ केले आहेत. याआधीही सलमानने 2017 साली फ्युचर ग्रूपच्या फूड हॉल या कंपनीला ही प्रॉपर्टी भाडेतत्वावर दिली होती.

बॉलिवूड सेलिब्रेटीजची असते वर्दळ

सलमान खानची ही अपार्टमेंट बॉलिवूड सेलिब्रेटींच्या वर्दळीनेही चर्चेत असते. इथं दिपीका पादुकोण, दिशा पाटणी आणि सारा अली खान सारख्या सेलेब्स शॉपिंग करताना पाहायला मिळतात.

काय करते लँडक्राफ्ट रिटेल प्रायव्हेट लिमिटेड?

लँडक्राफ्ट रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी फूड चेन चालवते. त्यामुळे आता इथं येणाऱ्या सेलिब्रिटींना खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे.