Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Royal Enfield Himalayan 450 : रॉयल एनफिल्ड लवकरच लॉन्च करणार Himalayan 450 अ‍ॅडवेंचर बाइक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield Himalayan 450

Image Source : www.bikewale.com

Royal Enfield Himalayan 450 : भारतात रॉयल एनफिल्ड हिमालयन बाइक खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. Royal Enfield यावर्षी अनेक मोटारसायकल लॉन्च करणार आहे. 2023 मध्ये, कंपनीने Super Meteor 650 लाँच केले आहे आणि आता Himalayan 450 लाँच करणार आहे.

Royal Enfield Upcoming Bike Launch: भारतात रॉयल एनफिल्ड हिमालयन बाइक खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. Royal Enfield यावर्षी अनेक मोटारसायकल लॉन्च करणार आहे. 2023 मध्ये, कंपनीने Super Meteor 650 लाँच केले आहे आणि आता  Himalayan 450 लाँच करणार आहे. ही अ‍ॅडवेंचर बाइकमध्ये येते. या बाइकबाबत अधिक माहिती जाऊन घेऊया. 

Royal Enfield Himalayan 450 डिटेल्स 

Royal Enfield ने गेल्या वर्षी हिमालयासारखे Scram 411 लाँच केले होते आणि तेव्हापासून अशी चर्चा केली जात होती की, आगामी काळात Himalayan 450 cc सेगमेंटमध्ये अधिक स्ट्रॉंग  इंजिनसह लॉन्च केले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन हिमालयन 450 मध्ये स्ट्रॉंग 450cc इंजिन मिळेल, जे 45bhp ची ऊर्जा निर्माण करेल. यामध्ये, 6 स्पीड गिअरबॉक्ससह, विशेषतः ऑफ-रोडिंगसाठी राइडिंग मोड देखील दिला जाऊ शकतो. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Royal Enfield ची आगामी अ‍ॅडवेंचर बाइक K1 (कोडनेम) नावाच्या नवीन प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाईल. रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 ला त्याच्या इतर सर्व बाइकपेक्षा वेगळ्या लुकमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे हिमालयन 411 सारखे दिसेल, परंतु डिझाइन पूर्णपणे नवीन आणि वेगळी असेल. यात वेगळ्या आकाराचा fuel tank, 21-इंच पुढची आणि 17-इंच मागील wheels, ट्यूबलेस टायर, सिंगल सीट, फ्लॅट हँडलबार असणार आहे. 

किंमत किती असू शकते? 

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ब्लूटूथ आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह अनेक फीचर्स यामध्ये पाहायला मिळतील. आगामी रॉयल एनफील्ड हिमालयन 450 भारतीय बाजारपेठेत 3 लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीच्या रेंजमध्ये ऑफर केली जाऊ शकते.

लॉन्च झाल्यानंतर ही बाइक KTM 390 Adventure सह इतर बाइकशी स्पर्धा करेल. LED लाइटिंग, डिजिटल क्लस्टर, ऑफसेट मोनोशॉक रिअर सस्पेन्शन, USD फ्रंट फोर्क्स, नवीन फ्रेम, ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टीम आणि ड्युअल चॅनल ABS सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये या बाइकमध्ये पाहायला मिळणार आहे.