Upcoming Royal Enfield Motorcycles: रॉयल एनफिल्ड वाहने आणि बुलेट्सची तरुणांपासून ते वयस्करांपर्यंत सगळ्यांनाच एक वेगळीच क्रेझ आहे. एप्रिल महिन्यात भारतात 73,136 रॉयल एनफिल्ड मोटारसायकलची विक्री झाली. रॉयल एनफिल्डच्या विक्रीत 17.66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 मध्ये फक्त 62,155 रॉयल एनफिल्डची विक्री झाली होती. अशातच रॉयल एनफिल्डचे नवीन मॉडेल बाजारात येण्यासाठी तयार आहे. यावेळी कंपनी एक नाही तर 5 मोटरसायकल बाजारात आणत आहे. या पाचही मोटरसायकलची माहिती आपण घेणार आहोत.
Table of contents [Show]
न्यू जनरेशन रॉयल एनफिल्ड बुलेट 350
न्यू जनरेशन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 या वर्षी लॉन्च केली जाणार आहे. ही रॉयल एनफिल्ड ब्रॅण्डमधील सर्वात स्वस्त बाईक असणार आहे. हे RE च्या J-सिरीज प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. ज्यात हंटर आणि नवीन-जनरल क्लासिक आणि 350cc इंजिन असेल. सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑईल-कूल्ड इंजिनही असणार आहे.
रॉयल एनफिल्ड हिमालयन 450
हिमालयन 450 ही भारतातील खूप दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या ADVs पैकी एक आहे. रॉयल एनफिल्डचे नवीन हिमालयन 450 सध्याच्या हिमालयापेक्षा अधिक स्ट्रॉंग आणि वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार आहे. यात लिक्विड-कूल्ड 450cc इंजिन असणार आहे. ज्याचा पॉवर आऊटपूट सुमारे 40 bhp, USD फ्रंट फोर्क्स, 21-इंच आणि 18-इंच वायर-स्पोक व्हील असणार आहे.
रॉयल एनफिल्ड 450cc रोडस्टर
Royal Enfield रोडस्टर देखील हिमालयन 450 वर आधारित रोड-बेस्ड नेकेड स्ट्रीट मोटरसायकल लॉन्च करणार आहे. RE मधील आगामी 450 cc रोडस्टर हेच इंजिन वापरणार आहे. यामध्ये सीटची कमी उंची, ट्यूबलेस टायर्ससह अलॉय व्हील आणि इतर अपडेट्स देखील असणार आहेत.
रॉयल एनफील्ड शॉटगन 650
रॉयल एनफील्ड शॉटगन 650 फर्स्ट EICMA 2021 मध्ये बॉबर संकल्पना म्हणून प्रदर्शित करण्यात आली होती. शॉटगन 650 ची पॉवरट्रेन Super Meteor 650 सारखी असेल आणि लॉन्च केल्यावर भारतात विक्रीसाठी सर्वात महाग RE असू शकते.
फुल-फेअर कॉन्टिनेंटल जीटी 650
येणाऱ्या मोटारसायकल मधील शेवटची फुल-फेअर कॉन्टिनेंटल जीटी 650 आहे. रॉयल एनफिल्डने अजून याबद्दल विशेष माहिती दिलेली नाही. कंपनीकडे आधीपासून रेस-स्पेक सेमी-फेअर कॉन्टिनेंटल जीटी 650 आहे. या सर्व मोटरसायकलच्या किमती कंपनीकडून अजून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत.