Royal Enfield Super Meteor 650: क्लासिक बाईक लॉंच करणाऱ्या कंपन्यांपैकी रॉयल एनफील्डची सुपर मेटियर 650 ही 43 मिमी शोवा इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फॉर्क्ससह ट्रिपर नेव्हिगेशन मिळवणारी 650 सेगमेंटमधील पहिली बाईक आहे. भारतातील KTM 390 Adventure, BMW G 310 GS, TVS Apache RR 310 यांसारख्या बाइक्सशी ती स्पर्धा करणार आहे. तर जाणून घेऊया तिची किंमत आणि फीचर्स.
Table of contents [Show]
- Royal Enfield Super Meteor 650 ची किंमत (Royal Enfield Super Meteor 650 price)
- Super Meteor 650 चे कलर ऑप्शन काय आहेत? (What are the color options of Super Meteor 650?)
- Royal Enfield Super Meteor 650 ची वैशिष्ट्ये आणि इंजिन (Features and engine)
- Super Meteor 650 ब्रेकिंग सिस्टम कशी आहे? (How is the Super Meteor 650 braking system?)
Royal Enfield Super Meteor 650 ची किंमत (Royal Enfield Super Meteor 650 price)
Royal Enfield Super Meteor 650 ची सुरुवातीची किंमत 348900 रुपये मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली आहे. कंपनी आपल्या इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 मध्ये हे इंजिन वापरते. ज्यामध्ये एक रोडस्टर आहे आणि दुसरी कॅफे रेसर बाईक आहे. Super Meteor 650 ही कंपनीची सर्वात आधुनिक रॉयल एनफील्ड बाईक आहे जी 43mm Showa इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क्स वापरते.
Super Meteor 650 Astral साठी ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन कलर ऑप्शन ठेवण्यात आले आहेत. Super Meteor 650 Interstellar साठी ड्युअल टोन ऑप्शन आहे ज्यामध्ये ग्रे आणि ग्रीन रंगांचा समावेश आहे. Super Meteor 650 Celestial मध्ये देखील कंपनी ड्युअल कलर टोनचे ऑप्शन देत आहे, ज्यामध्ये रेड आणि ब्लू कलर ऑप्शन उपलब्ध असतील.
Royal Enfield Super Meteor 650 ची वैशिष्ट्ये आणि इंजिन (Features and engine)
हॅलोजन हेड आणि टेल लॅम्प इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटीमध्ये उपलब्ध आहेत. तर Super Meteor 650 मध्ये LED युनिटसोबत USB चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे. Super Meteor मध्ये 648 cc इंजिन वापरण्यात आले आहे, जे 7250 rpm वर 47 hp आणि 5650 rpm वर 52.3 Nm टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
Super Meteor 650 ब्रेकिंग सिस्टम कशी आहे? (How is the Super Meteor 650 braking system?)
Royal Enfield ने या बाईकच्या पुढील बाजूस 320 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 300 mm डिस्क ब्रेक दिले आहेत ज्यात ड्युअल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे.