क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अॅण्ड अॅनालिटिक्सच्या मासिक 'रोटी राईस रेट'च्या 7 सप्टेंबरला जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, जुलैच्या तुलनेत हा खर्च किंचित कमी झाला आहे. मात्र, टोमॅटोच्या दर वाढीमुळे ऑगस्टमध्ये व्हेज थाळीच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे रिपोर्टवरुन समजत आहे.
वार्षिक आधारावर झाली वाढ
रिपोर्टनुसार ऑगस्टमध्ये, व्हेज थाळीच्या किमतीत महिना-दर-महिना आधारावर किरकोळ घट झाली आणि टोमॅटोच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे या आर्थिक वर्षात दुसर्यांदा वार्षिक वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच, नाॅन-व्हेज थाळी देखली वार्षिक आधारावर पाहायला गेल्यास तिच्यातही 13 टक्के वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
याशिवाय आपल्याला जी व्हेज थाळीच्या किमतीत 24 टक्के झालेली वाढ दिसत आहे. यातही 21 टक्के वाढीच कारण फक्त टोमॅटो आहे. जी वार्षिक 176 टक्के वाढून ऑगस्टमध्ये 102 रुपये प्रति किलो झाली. हीच किंमत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फक्त 37 रुपये प्रति किलो होती. यावरुन टोमॅटोमुळे सामांन्याच्या खिशाला फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.
दोन्हींच्या किमतीत झाली घट
जशी व्हेज थाळीच्या किमतीत महिन्याच्या आधारवार थोडी घट पाहायला मिळाली. तशीच घट रिपोर्टनुसार नाॅन-व्हेज थाळीच्या किमतीत पाहायला मिळत आहे. कारण, ब्राॅयलर म्हणजेच चिकनच्या किमती, जे खर्चाच्या 50 टक्क्याहून अधिक योगदान देतात. ते वार्षिक आधारावर 1 ते 3 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
तसेच, वर्षापूर्वीच्या अवधीच्या तुलनेत व्हेजीटेबल ऑईल 17 टक्के आणि बटाट्याच्या किमतीत 14 टक्क्यांनी घट झाल्याने दोन्ही थाळींच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या असल्याचे रिपोर्टवरुन दिसून येत आहे.