Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करताना एसआयपी आणि एसडब्लूपीची होईल मदत; कशी, जाणून घ्या

Retirement Planning

Image Source : www.shutterstock.co

Retirement Planning: तरुण्यातच प्रत्येकाने निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आर्थिक तरतूद करायला हवी. आत्तापासूनच थोडी थोडी केलेली गुंतवणूक उद्या जाऊन मोठा फंड तयार करू शकते. त्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) पद्धतीची मदत घेता येऊ शकते. तसेच एसडब्लूपीच्या (SWP) मदतीने निवृत्तीनंतर ठराविक पैसे बँक खात्यात खर्चासाठी जमा केले जातात.

तरुण्यातच प्रत्येकाने म्हातारपणाची सोय करून ठेवावी, असे पूर्वीचे लोक सांगायचे. त्यांच्या हा सल्ला आर्थिक नियोजनात अतिशय महत्त्वाचा ठरतो. तारुण्यात नोकरी करत असताना मासिक आधारावर पगार मिळतो. याच पैशांचे योग्य नियोजन करून निवृत्तीनंतर पेन्शन किंवा मोठा फंड तयार करता येऊ शकतो. आर्थिक नियोजनामुळे निवृत्तीनंतरही स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगता येते.

सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी बहुसंख्य लोक म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP Investment) सध्या गुंतवणूक करताना पाहायला मिळत आहेत. याच माध्यमातून निवृत्तीसाठी मोठी रक्कम उभारता येऊ शकते. तसेच उभारण्यात आलेली मोठी रक्कम एसडब्लूपीच्या (SWP) माध्यमातून खर्चही करता येते. आज आपण या दोन्हीबद्दल जाणून घेऊयात.

एसआयपी आणि एसडब्लूपी बद्दल जाणून घ्या

निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करताना दोन टप्पे विचारात घ्यायला हवेत. पहिला टप्प्यात गुंतवलेली रक्कम हळूहळू वाढवत नेणे. तर दुसऱ्या टप्प्यात निवृत्तीनंतर ती रक्कम  नियोजनाने खर्च करणे. गुंतवलेली रक्कम वाढवण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडातील एसआयपी पद्धतीचा (SIP System) वापर करू शकता. यामध्ये सुरुवातीला थोडे थोडे पैसे गुंतवून मोठी रक्कम परतावा स्वरूपात मिळवता येऊ शकते. म्युच्युअल फंडात किमान 500 रुपये गुंतवून गुंतवणूक सुरु करता येते. या गुंतवणुकीवर कमीत कमी 12 टक्के परतावा मिळतो. 

तर निवृत्तीनंतर पैसे खर्च करण्यासाठी एसडब्लूपी (SWP) पर्यायाचा वापर करता येऊ शकतो. तुमचा मासिक खर्च भागवण्यासाठी तुमची गुंतवणूक कशी वापरता येईल, यासाठी एसडब्लूपी मदत करते. सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन म्हणजे एसडब्लूपी होय. निवृत्तीनंतर पैसे खर्च करताना खूप विचार करावा लागतो. या माध्यमातून तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडाला महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला विशिष्ट रक्कम डेबिट करण्याची सूचना द्यावी लागेल. त्यानंतर पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यात येतील. पैसे काढल्यानंतर उरलेली रक्कम फंडात गुंतून राहते आणि त्यावर परतावा मिळत राहतो. हा परतावा चक्रवाढ व्याजासहित मिळत असल्याने गुंतवणूकदाराचा फायदा होतो.

आर्थिक नियोजन करताना या गोष्टीकडे लक्ष द्या

भविष्यासाठी आर्थिक तरतूद करताना वर्तमानातील काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये मुलांचे शिक्षण, मासिक खर्च आणि बचत यांचा ताळमेळ साधायला हवा. तसेच निवृत्तीचे आर्थिक नियोजन करताना मुलांचे उच्च शिक्षण, मुलांचे लग्न किंवा एखादी परदेशवारी यासारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी देखील बचत आणि गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा आणि स्वतःचा विमा काढणे देखील गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात कदाचित आरोग्यासंदर्भात अडचण आली, तर या विम्याच्या अंतर्गत लाभ घेता येतो.

Source: hindi.financialexpress.com