Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडियन क्रिप्टो प्लॅटफॉर्म ‘वॉल्ड’कडून पैसे काढण्यावर, ट्रेडिंगवर निर्बंध!

इंडियन क्रिप्टो प्लॅटफॉर्म ‘वॉल्ड’कडून पैसे काढण्यावर, ट्रेडिंगवर निर्बंध!

Vauld Crisis : क्रिप्टोमार्केटमध्ये घसरण सुरू झाल्यामुळे 12 जूनपासून गुंतवणूकदारांनी सुमारे 197.7 मिलिअन डॉलरची (भारतीय रूपयांत 1,563 कोटी) गुंतवणूक काढून घेतली.

इंडियन क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) प्लॅटफॉर्म 'वॉल्ड; कंपनी सध्या आर्थिक आव्हानांचा (Vauld Crisis) सामना करत असल्याने कंपनीने गुंतवणूकदारांना पैसे काढण्यावर, ट्रेडिंग करण्यावर आणि डिपॉझिट केलेला निधी काढण्यावर निर्बंध (Vauld Suspends Withdrawal) घातले आहेत.

क्रिप्टोमार्केटमध्ये घसरण सुरू झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यास सुरूवात केली. साधारण 12 जूनपासून गुंतवणूकदारांनी सुमारे 197.7 मिलिअन डॉलरची (भारतीय रूपयांत 1,563 कोटी) गुंतवणूक काढून घेतली. अर्थात यामुळे वॉल्डला व्यावसायिक आणि आर्थिक अडचणींला सामोरे जावे लागले, अशी कबुली वॉल्डचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन बथिजा यांनी कंपनीच्या ब्लॉग पोस्टद्वारे दिली.


दरम्यान सिंगापूरस्थित ‘वॉल्ड’ने असेही म्हटले आहे की, आम्ही रिस्ट्रक्चरींगचा विचार करत असून यासाठी नवीन गुंतवणूकदारांच्या शोधात आहोत. त्यामुळे ‘वॉल्ड’ सिंगापूरच्या कोर्टासमोर मोराटोरियम (Moratorium)साठी मागणी करणार आहे. जेणेकरून कंपनीला ‘वॉल्ड’चे रिस्ट्रक्चरींग करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल. अशा परिस्थितीत लगेच कारवाई करणे भागधारकांच्या हिताचे ठरेल, असेही कंपनीने म्हटले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कंपनीने क्रोल पीटीई लिमिटेड कंपनीची आर्थिक सल्लागार म्हणून तर सिरिल अमरचंद मंगलदास आणि राजाह आणि टॅन सिंगापूर एलएलपी यांची कायदेशीर सल्लागार म्हणून भारत आणि सिंगापूरसाठी निवड केली आहे, अशी माहिती बथिजा यांनी दिली.

'वॉल्ड'कडून यापूर्वी 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात!

‘वॉल्ड’ने काही दिवसांपूर्वी कंपनीतील 30 टक्के कर्मचारी कमी केले होते. त्यावेळी कंपनीची मार्केटमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. जागतिक मंदीव्यतिरिक्त भारतातील क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मला अतिरिक्त टॅक्ससह अनेक अडचणींचा (Vauld Crisis) सामना करावा लागत आहे. भारतात केंद्र सरकारने नुकतेच व्हर्च्युअल डिजिटल असेट (Virtual Digital Asset)च्या नफ्यावर 30 टक्के करासह 1 टक्के टीडीएस आकारण्याची घोषणा केली.

‘वॉल्ड’ कंपनी व्यवस्थापन आमच्या आर्थिक आणि कायदेशीर सल्लागारांसह सर्व संभाव्य पर्यायांचा अंदाज घेत आहोत; उद्भवलेल्या परिस्थितीचे विश्लेषण करून वॉल्डचे भागधारक आणि गुंतवणूकदार यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही बथिजा यांनी ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे.