Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Motilal Oswal Mutual Fund : मोतीलाल ओसवालच्या इंटरनॅशनल फंडांवरील निर्बंध हटवले, गुंतवणुकीसाठी पुन्हा खुले होणार

Motilal Oswal International Mutual Funds

Image Source : www.businesstoday.in

Motilal Oswal Mutual Fund: सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना परदेशातील सिक्युरिटीज आणि फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी 7 बिलियन डॉलर्सची मर्यादा ठेवली आहे. मोतीलाल ओसवाल फंडाने ही मर्यादा पूर्ण केली होती. त्यामुळे सेबीने मोतीलाल ओसवालला इंटरनॅशनल म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक नवी गुंतवणूक स्वीकारण्यास मज्जाव केला होता.

म्युच्युअल फंडांचा पोर्टफोलिओत इंटरनॅशनल म्युच्युअल फंडांचा समावेश करण्यासाठी वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. शेअर बाजार नियंत्रक सेबीने मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेंट कंपनीच्या (MOAMC) पाच इंटरनॅशनल म्युच्युअल फंडांवरील  लादलेले गुंतवणूक निर्बंध दूर केले आहेत. आता या पाचही फंडांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

मोतीलाल ओसवाल फंड घराण्याच्या मोतीलाल ओसवाल एसअॅंडपी 500 इंडेक्स फंड (Motilal Oswal S&P 500 Index Fund), मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 ईटीएफ (Motilal Oswal NASDAQ 100 ETF), मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड (Motilal Oswal NASDAQ 100 Fund of Fund), मोतीलाल ओसवाल एमएससीआय ईएएफई टॉप 100 सिलेक्ट इंडेक्स फंड (Motilal Oswal MSCI EAFE Top 100 Select Index Fund) आणि मोतीलाल ओसवाल नॅसडॅक क्यू 50 ईटीएफ (Motilal Oswal NASDAQ Q 50 ETF) या पाच फंडांवर 1 डिसेंबर 2022 पासून सेबीने निर्बंध लागू केले होते. सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना परदेशातील सिक्युरिटीज आणि फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी 7 बिलियन डॉलर्सची मर्यादा ठेवली आहे. मोतीलाल ओसवाल फंडाने ही मर्यादा पूर्ण केली होती. त्यामुळे सेबीने मोतीलाल ओसवालला इंटरनॅशनल म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक नवी गुंतवणूक स्वीकारण्यास मज्जाव केला होता.

निर्बंधांमध्ये इंटरनॅशनल फंडात दोन लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा ठेवण्यात आली होती. प्रत्येक पॅन क्रमांकावर इंटरनॅशनल फंडात केवळ दोन लाखांची गुंतवणूक करण्याचे बंधन होते. तसेच या फंडांमध्ये एसआयपी किंवा एसटीपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास परवानगी नव्हती. आता मात्र हे सर्व निर्बंध दूर करण्यात आल्याचे मोतीलाल ओसवाल एएमसीने म्हटले आहे. आता 1 जानेवारी 2023 पासून या पाचही इंटरनॅशनल फंडांत कोणत्याही निर्बंधांशिवाय गुंतवणूक करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

एकरकमी किंवा स्विचइन पर्यायाने गुंतवणूकदार आता कितीही रक्कम या योजनेत गुंतवू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. शिवाय इंटरनॅशनल फंडांसाठी नियोजनबद्ध गुंतवणूक पर्याय (SIP) , नियोजनबद्ध हस्तांतर पर्याय (STP) यातून गुंतवणूक सुरु करता येणार आहे.