दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने उत्तराखंडमधील चार धाम म्हणजेच बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भेट देतात. ही तीर्थक्षेत्रे समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर असल्यामुळे भाविकांना मोबाईल नेटवर्क मिळण्यात अडचण येते. यामुळे अनेकदा भाविकांना ऑनलाईन पेमेंट किंवा इतर डिजिटल सेवांचा वापर करता येत नव्हते. त्यामुळे आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने 5G इंटरनेट सेवा सुरू केली.
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जिओ कंपनीने ही सेवा सुरू करून दिल्याबद्दल भाविकांच्यावतीने जिओ कंपनीचे आभार मानले. चारधाम मंदिर परिसरात 5G सेवेची सुरुवात करून जिओने डिजिटल युगात क्रांति घडवून आणल्याचे मत धामी यांनी व्यक्त केले.
जिओच्या या सेवेमुळे उत्तराखंड आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांना हायस्पीड इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिओ सातत्याने देशातील बहुतांश भागांमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासोबतच दुर्गम भागांपर्यंत देखील ही सेवा पोहोचवण्याचा जिओचा मानस आहे. चारधाम यात्रेत ही सेवा दिल्यामुळे नैसर्गिक आपत्ती व इतर समस्यांवर पाळत ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेला देखील याची मदत होणार आहे.
भारत-तिबेट सिमेवर जिओ नेटवर्क
देशाच्या सीमेवरील प्रथम गाव माना येथे जिओ नेटवर्क उपलब्ध आहे. चारधाममधील सर्वात उंच भाग हेमकुंड (गुरुद्वारा साहेब) येथे समुद्रसपाटीपासून सुमारे 13 किलोमीटर उंचीवर जिओने ही सुविधा प्रदान केली आहे. देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेने जिओ अधिक सक्रियपणे आपला विस्तार करत आहे. चार धाममधील बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिर परिसरात Jio 5G सेवेमुळे येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना डिजिटल सेवांचा अखंड लाभ घेता येणार आहे.
Source- www.hindi.moneycontrol.com