Reliance Jio Plan: नोकिया कॉर्पोरेशन या फिनलंडमधील मोबाईल फोन निर्मिती करणाऱ्या दुरसंचार कंपणीनेच भारतात सर्वप्रथम मोबाईल आणला. 2जी हँडसेटसह मार्केट मध्ये आलेल्या या मोबाईल ने सगळ्यांना वेड लागले. आणि मग येथुन सुरु झाली ती विविध फिचर्सचे मोबाईल आणि नेटवर्क ची मालिका. आजच्या घडीला प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आणि 4जी नेटवर्क मोबाईल आहेत. मग ग्रामीण परिसर असो अथवा शहरी, तरुणांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सगळ्यांनाच विविध कार्यांसाठी मोबाईलची गरज भासते. आणि या डिजीटायझेशनच्या काळात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कार्य मोबाईलवर करण्याची सवय नागरिकांना लागली आहे. आणि याच गोष्टींचा फायदा आज मोबाईल आणि नेटवर्क कंपन्यांनी घेतला आहे.
Table of contents [Show]
जीओ ने हेरली ग्राहकांची गरज
परंतु, आजही असे अनेक लोकं आपल्या देशात आहेत, ज्यांना मोबाईल इंटरनेटची जास्त गरज भासत नाही. त्यांना केवळ मोबाईल वरुन फोन करने आणि आलेल्या फोनवर बोलने, एवढेच काय ते काम असतात. मात्र सर्व कंपन्यांनी कॉलिंग आणि इंटरनेट सुविधा यांचाच विचार करुन रिचार्ज पॅकेजेस तयार केलेले आहेत. हीच बाब हेरुन जीओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे.
75 रुपयांचा जीओ रिचार्ज प्लॅन
जे ग्राहक मोबाईलचा जास्तीत जास्त उपयोग केवळ कॉलिंग करीता करतात. आणि जे अगदी स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात होते. अश्या ग्राहकांसाठी जीओ चा 75 रुपयांचा हा प्लॅन आहे. मात्र ज्या ग्राहकांकडे जीओ फोन आहे, त्याच ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता योणार आहे.
75 रुपयांत काय आहे सुविधा ?
केवळ JioPhone असणाऱ्या ग्राहकालाच हा रिचार्ज करता येणार आहे. यामध्ये ग्राहकांना 23 दिवसांची वैलिडिटी मिळते. सोबतच दररोज 100MB डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त सर्व नेटवर्क वर स्थानिक आणि एसटीडी अनलिमिटेड कॉल आणि 50 SMS फ्रि मध्ये मिळणार आहे. तसेच 200 MB बुस्टर डेटा फ्रि मिळेल.
इतरही रिचार्ज प्लॅन
या नवीन 75 रुपयांच्या रिचार्ज प्रीपेड प्लॅन व्यतिरिक्त, रिलायन्स जिओने JioPhone वापरकर्त्यांसाठी 125 रुपये, 155 रुपये, 185 रुपये आणि 749 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर केले आहे.
जीओचे मालक
मुकेश धीरूभाई अंबानी हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार,अंबानींची एकूण संपत्ती फेब्रुवारी 2023 पर्यंत 83.4 अब्ज डॉलर इतकी आहे. यामुळे मुकेश धीरूभाई अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.