Reliance Foundation announces merit based Scholarships: 2023 वर्षातील चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतलेल्या अंडरग्रेजुएट (यूजी) आणि पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाऊंडेशनने गुणवत्ता आधारीत शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे.
इथे करा स्कॉलरशिपसाठी अर्ज (Apply for the scholarship here)
शैक्षणिक सत्र 2022-23 साठी अंडर ग्रुज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी 2 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन 5 हजार गुणवत्ताधारक अंडरग्रॅजुएट विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 2 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देईल. याशिवाय 100 गुणवंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांना फाउंडेशन 6 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या संपूर्ण अभ्यास कालावधीसाठी असेल. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांच्या 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत रिलायन्स फाउंडेशनच्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची संधी आहे. पात्र उमेदवार रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकृत वेबसाइट, Scholarships.reliancefoundation.org वर भेट देऊन अर्ज करता येणार आहेत.
हे उमेदवार शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील (These candidates can apply for the scholarship)
या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने साकार करणे, मुलींना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे
हे आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 15 लाखांपेक्षा कमी आहे आणि ते शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये अंडर ग्रुज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट च्या आधीच्या वर्षात आहेत ते स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.
पीजी मेरिट स्कॉलरशिपसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अनेक टप्प्यांतून जावे लागेल. ज्यामध्ये तज्ज्ञांच्या मुलाखतींचाही समावेश आहे. सर्व टप्प्यांतील 100 यशस्वी उमेदवारांची रिलायन्स फाऊंडेशनद्वारे कॉलरशिपसाठी निवड केली जाईल.
संगणक विज्ञान, आर्टिफिशिएल इंटेलिजन्स, गणित, कम्प्युटर सायंस, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा केमिकल इंजिनियरींग, साहित्य, जीवन विज्ञान आदी अभ्यासक्रमातील विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. यात बारावीमध्ये मिळालेल्या गुणांच्याआधारे मेरिट स्कॉलरशिपसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. तर, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्य्यांची निवड मुलाखतीच्या विविध टप्प्यांद्वारे केली जाईल.