Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST Collection: जीएसटीचे रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन, सरकारी तिजोरीत 18 लाख कोटींचा भरणा

GST

GST Collection: प्रत्येक वर्षी ग्राहक जीएसटी कर भरत असतात. या जीएसटीमधून वर्षाला एक मोठा कर जमा होत असतो. यंदाच्या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023 मध्ये आतापर्यंतची एकूण किती जीएसटी रक्कम सरकारी तिजोरीत जमा झालेली आहे, ते आपण जाणून घेऊया.

GST Record Break Collection: जीएसटी म्हणजे संपूर्ण देशासाठी लागू असलेला एक अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर एकाच प्रकारचा आकारला जाणारा कर आहे. आज 2022-2023 आर्थिक वर्ष संपत आहे. तर 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. प्राप्त माहितीनुसार जीएसटीच्या गेल्या अकरा महिन्यांमध्ये संकलित झालेल्या रकमेने विक्रम मोडला आहे. एप्रिल 2022 ते  मार्च 2023 ची अधिकृत आकडेवारी सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र 11 महिन्यांमध्ये जमा झालेली जीएसटीची रक्कम 18 लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या रक्कमेने जीएसटी लागू झाल्यापासूनचा विक्रम मोडला आहे.

जीएसटी म्हणजे काय ?

जीएसटी हा वस्तू किंवा सेवा सेवा खरेदीसाठी ग्राहकांवर लावलेला टॅक्स आहे. या टॅक्सची अंमलबजावणी 1 जुलै, 2017 पासून सुरू करण्यात आली. जीएसटीपूर्वी ग्राहकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष टॅक्स लावले जात होते. प्रत्यक्ष टॅक्समध्ये ग्राहकांकडून इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, गिफ्ट टॅक्स, पालिकेचा टॅक्स आदी टॅक्सचा समावेश होता. तर अप्रत्यक्ष टॅक्समध्ये एकूण 17 प्रकारचे टॅक्स समाविष्ट होते. हे सर्व टॅक्स रद्द करून सरकारने ते एका टॅक्समध्ये एकत्रित केले. त्याला जीएसटी (Goods & Services Tax) टॅक्स म्हटले गेले. हा टॅक्स विविध वस्तू आणि सेवांवर लावला जातो. संपूर्ण देशात सर्व वस्तूंवर एकाच पद्धतीने टॅक्स लावला जातो.

11 महिन्यांमध्ये किती रक्कम झाली जमा?

संपूर्ण भारतात  1 जुलै 2017 रोजी GST कायदा एकाच वेळी लागू झाला होता. आणि या आर्थिक वर्षात जमा झालेला 18 लाख कोटी रुपयांचा आकडा या सहा वर्षांतील सर्वाधिक आकडा आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या 11 महिन्यांत GST संकलनाने आधीच 16.46 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे, जो वर्षभरात 22.7% ची लक्षणीय वाढ दर्शवितो आहे.

मार्चमध्ये किती टक्के जीएसटी संकलन अपेक्षित आहे ?

मार्च 2023 मध्ये किमान 1.50 लाख कोटी जीएसटी रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा आहे. संकलनाचे आकडे आता येत आहेत, परंतु मार्चमध्ये सरासरी मासिक जीएसटी संकलन अंदाजे 1.49 लाख कोटी रुपये शिल्लक आहे, तर 2022-23 साठी एकूण जीएसटी महसूल 17.88 लाख कोटी रुपये होईल, म्हणजेच 18 लाख रुपये होऊ शकतो.

फेब्रुवारी महिन्यातील जीएसटी संकलन किती होते ?

काही अधिकाऱ्यांचे मत आहे की, केंद्र आणि राज्य या दोन्हींसाठी जीएसटी संकलनात ही वाढ आधीच अपेक्षित होती. जर आपण काही महिन्यांची आकडेवारी बघितली तर, फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी संकलन 1,49,577 कोटी रुपये होते, जे जानेवारी महिन्याच्या  तुलनेत कमी होते. जानेवारी 2023 मध्ये, हा आकडा 1.57 लाख कोटी रुपये होता, जो मासिक स्वरुपाने बघितला तर आतापर्यंतचे दुसऱ्यांदा झालेले संकलन आहे. आणि त्याआधी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन सर्वाधिक होते. 

gst-rate-2.jpg