जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या चिंतेचे वातावरण दिसत आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले आहे. मात्र तरीही नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प होणार असल्याचा अंदाज ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने व्यक्त केला आहे.
आर्थिक संशोधन संस्था ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने मंगळवारी सांगितले की, भारत 2022 मध्ये कच्चे तेल आणि कोळशाच्या आयातीवर 270 अब्ज डॉलर खर्च करेल. कमकुवत जागतिक मागणी आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदीचे भारतीय अर्थव्यवस्था आणि निर्यातदारांवर नवीन वर्षात किरकोळ परिणाम होतील. अशा परिस्थितीत भारताने आपले चालू खाते सुधारण्यासाठी ऊर्जा आयातीवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आर्थिक संशोधन संस्था ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने मंगळवारी सांगितले की भारत 2022 मध्ये कच्चे तेल आणि कोळशाच्या आयातीवर 270 अब्ज डॉलर खर्च करेल. हे खर्चाचे प्रमाण कमी करण्यासाठी भारताला स्थानिक तेलक्षेत्रातील उत्खननाचे काम वाढवून कोळसा खाणीतून उत्पादन वाढवावे लागणार आहे. यामुळे ऊर्जा आयातीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि चालू खात्याची स्थिती सुधारेल.
भारताची स्थिती मजबूत ( Indian economy)
अमेरिकेने चीनला बाजूला ठेऊन पर्यायी पुरवठा साखळी तयार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळींची पुनर्रचना केली जात आहे, असे संघटनेने म्हटले आहे. अनेक उत्पादक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. या ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी भारताची स्थिती चांगली आहे.
निर्यात 450 अब्ज डॉलर्सपर्यंत (Indian export)
जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. असे असूनही 2022 पर्यंत भारताची निर्यात 440-450 अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकते. 2021 मध्ये हा आकडा 395 डॉलर अब्ज असेल. याच कालावधीत, आयात देखील 725 अब्ज पडॉलरर्यंत वाढू शकते, जी 2021 मध्ये 573 अब्ज डॉलर होईल.