क्रिप्टो चलनावर जीएसटी (GST) लागू झालेला नाही. या चलनावर जीएसटी लावण्यासाठी अजून उशीर होऊ शकतो. सरकारने नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी क्रिप्टो चलनाबाबत जीएसटी बाबतचा अहवाल सादर केलेला नाही. सर्वप्रथम क्रिप्टो चलनाचा समावेश वस्तू किंवा सेवा या श्रेणीत होणार हे आधी ठरवावे लागेल. यामुळे क्रिप्टो चलनावर जीएसटी लावणे सरकारसाठी आव्हान ठरत आहे.
क्रिप्टो चलनाच्या एकूण मूल्यावर जीएसटी लागू होणार नाही
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी अर्थ संकल्पात असे जाहीर केले की भारतात क्रिप्टो चलनावर 30 टक्के कर लागू केला जाईल. याशिवाय वर्षभरात 10 हजरांपेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल पेमेंटवर 1 टक्के टीडीएस लावला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. या निर्णयाची अमलबजावणी 1 जुलै 2022 नंतर करण्यात आली.
भारताच्या आर्थिक स्थिरतेला क्रिप्टोपासून धोका
क्रिप्टो चलन (Cryptocurrency) हे देशाच्या आर्थिक स्थिरतेला धोकादायक आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. क्रिप्टो चलनात गुंतवणूक केल्यास मालमत्तेच्या ठराविक मूल्याचा निकष लावला जाऊ शकत नाही. जीएसटी हा नेहमी वस्तु किंवा सेवांवर लागू होऊ शकतो मालमत्तेवर नाही आणि ही मालमत्ता स्थिर नाही जंगम असल्यामुळे सरकारसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे.