Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Realme 11x 5G Sale: Realme 11 5G फोन खरेदीची संधी! कंपनीकडून आजच्या खास सेलमध्ये मिळणार डिस्काउंट

realme 11 5G

Image Source : www.buy.realme.com

Realme 11x 5G Sale: कंपनीने 24 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पहिल्यांदाच Realme 11x 5G ची ऑनलाईन विक्री केली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आज दुसऱ्यांदा खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये Realme 11x 5G 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला फोन 13 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

रिअलमी या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त Realme 11x 5G या लेटेस्ट स्मार्टफोनचा ऑनलाईन सेल आयोजित केला आहे. आज 25 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता रिअलमीच्या वेबसाईटवर हा सेल सुरु आहे. Realme 11x 5G हा अद्याप भारतीय बाजारात उपलब्ध झालेला नाही.

कंपनीने 24 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पहिल्यांदाच Realme 11x 5G ची ऑनलाईन विक्री केली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आज दुसऱ्यांदा खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये Realme 11x 5G 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला फोन 13 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

या सेलमध्ये कंपनीने खास ऑफर्स दिली आहे. प्रत्येक 10 मिनिटांला लकी ग्राहकाला रिअलमी बड्स एअर 5 बक्षीस दिले जाणार आहेत. बड्स एअर 5 ची किंमत 4999 रुपये आहे. 

Realme 11x 5G हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. यात 6.5 इंच IPS LCD FHD 120 Hz डिस्प्ले आहे. रिअलमी UI 4.0 सह यात अॅंड्रॉइड 13 चा समावेश आहे. 5000 mAh बॅटरी आणि 33 W चा चार्जर आहे. हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.

Realme 11x 5Gमध्ये 8 मेगापिक्सेल सेल्फि कॅमेरा, 64 मेगापिक्सेल मेन कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये अतिरिक्त डेटा स्टोअर करण्यासाठी एसडी कार्डसाठी स्लॉट ठेवण्यात आला आहे.

डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल Realme 11x 5G

भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत अद्याप Realme 11x 5G विक्रीसाठी उपलब्ध झालेला नाही. मात्र कंपनीने 5 व्या वर्धापन दिनानिमित्त Realme 11x 5G ची ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. आज दुसऱ्यांदा दुपारी 12 वाजता कंपनीच्या वेबसाईटवर हा फोन खरेदी करता येईल. Realme 11x 5G चे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 14999 रुपये आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 15999 रुपये आहे. एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या कार्ड्सनी खरेदी केल्यास फोनवर 1000 रुपयांची सवलत मिळेल, असे कंपनीने जाहिरातीत म्हटले आहे.