Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate Market : रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा तेजी, विक्रीच्या बाबतीत मुंबई देशात अव्वल

Real Estate Market

कोविड-19 महामारीनंतर अर्थव्यवस्थेच्या स्थितीत झालेल्या सुधारणेमुळे देशातील प्रमुख 8 शहरांमधील निवासी विक्री 34 टक्क्यांनी वाढून 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मालमत्ता सल्लागार फर्म नाइट फ्रँकने (Real estate market) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी सादर केली.

कोविड-19 महामारीनंतर अर्थव्यवस्थेच्या स्थितीत झालेल्या सुधारणेमुळे देशातील प्रमुख 8 शहरांमधील निवासी विक्री 34 टक्क्यांनी वाढून 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मालमत्ता सल्लागार फर्म नाइट फ्रँकने (Real estate market) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी सादर केली. गेल्या 6 महिन्यांतील देशातील टॉप 8 शहरांतील मालमत्ता बाजारांच्या स्थितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी एकूण कार्यालयीन जागांची मागणी 36 टक्क्यांनी वाढून 51.6 दशलक्ष चौरस फूट झाली. या अहवालानुसार, गेल्या वर्षी टॉप 8 शहरांमधील निवासी युनिट्सची विक्री 34 टक्क्यांनी वाढून 3,12,666 युनिट्सवर गेली आहे. गेल्या 9 वर्षांतील ही सर्वोच्च पातळी आहे. नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले की, घराच्या किमती आणि गृहकर्जावरील व्याजदरात वाढ होऊनही 2022 मध्ये निवासी युनिट्सची विक्री वाढली.

विक्रीच्या बाबतीत मुंबई देशात अव्वल 

आकडेवारीनुसार, निवासी विक्रीच्या बाबतीत मुंबई 85,169 युनिट्ससह अव्वल आहे. हा आकडा 2021 च्या तुलनेत 35 टक्क्यांनी अधिक आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्ये निवासी मालमत्तेची मागणी 67 टक्क्यांनी वाढून 58,460 युनिट्सवर पोहोचली, तर बेंगळुरूमध्ये ही मागणी 40 टक्क्यांनी वाढून 53,363 युनिट्सवर पोहोचली. या कालावधीत पुण्यातील घरांची विक्री 17 टक्क्यांनी वाढून 43,410 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे हैदराबादमधील निवासी मालमत्तांची विक्री 28 टक्क्यांनी वाढून 31,046 युनिट्सवर पोहोचली आहे. विक्री चेन्नईमध्ये 19 टक्के आणि अहमदाबादमध्ये 58 टक्क्यांनी वाढून अनुक्रमे 14,248 युनिट्स आणि 14,062 युनिट्स झाली.

कोलकातामध्ये घट दिसून आली

गेल्या वर्षभरात निवासी विक्रीत घट झालेले कोलकाता हे एकमेव शहर आहे. 10 टक्क्यांच्या घसरणीसह ते 12,909 युनिट्सवर राहिले. यासोबतच नाइट फ्रँक इंडियाने सांगितले की, भू-राजकीय आव्हाने असतानाही देशातील कार्यालयीन क्षेत्राच्या मागणीत कमालीची सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षभरात कार्यालयीन जागेच्या मागणीच्या बाबतीत, बेंगळुरूने 14.5 दशलक्ष चौ फुट ने सर्वात पुढे राहिले. यानंतर दिल्ली-एनसीआरने 89 लाख स्क्वेअर फूट ऑफिस स्पेस लीजवर दिली. बैजल म्हणाले, “एक दशकाहून अधिक काळ प्रथमच, आम्ही एकाच वेळी सर्व प्रमुख रिअल इस्टेट विभागांमध्ये वाढ पाहिली आहे. 2022 मध्ये, निवासी, कार्यालय, गोदाम आणि किरकोळ स्थावर मालमत्तेच्या सर्व विभागांमध्ये विक्री वाढली आहे.