Quant Healthcare Fund: क्वांट म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांसाठी एक नवी योजना बाजारात आणली आहे. आजपासून (27 जून) सबस्क्रिप्शनसाठी न्यू फंड ऑफर खुली झाली आहे. क्वांट हेल्थकेअर फंड (Quant Healthcare Fund - QHF) असे या योजनेचे नाव आहे.
या सेक्टोरल फंड योजनेद्वारे लाइफ सायन्स, वेलनेस, हेल्थकेअर आणि विमा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल. भारतात आरोग्य क्षेत्राची वाढ झपाट्याने होत आहे. हेल्थकेअर क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानही येत आहे. अशा कंपन्यांमध्ये फंड हाऊसद्वारे गुंतवणूक केली जाईल.
क्वांट म्युच्युअल फंड हाऊसकडे 18,500 कोटींची अॅसेट अंडर मॅनेजमेंट आहे. हा फंड 27 जून रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून 11 जुलैला बंद होईल. (Quant Healthcare Fund launch) याआधी 20 जून रोजी क्वांट म्युच्युअल फंडद्वारे Quant BFSI फंड लाँच करण्यात आला होता.
क्वांट हेल्थकेअर फंडद्वारे कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक करता येईल?
ज्या गुंतवणूकदारांना आरोग्य आणि संबंधित क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक इच्छा आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. या फंडमधील 80% रक्कम हेल्थकेअर आणि वेलनेस कंपन्यांमध्ये गुंतवण्यात येईल. आरोग्य क्षेत्रात अनेक नव्या टेक्नॉलॉजी येत आहे. यासंबंधित कंपन्यांनाही गुंतवणुकीसाठी प्राधान्य देण्यात येईल. फार्मास्युटिकल, बायोटेक, हॉस्पिटल्स, डाग्नॉस्टिक सर्व्हिसेस, क्लिनिकल ट्रायल, टेलिमेडिसिन, मेडिकल आऊटसोर्सिंग, मेडिकल टुरिझम, आरोग्य विमा, वैद्यकीय उपकरणे या संबंधित क्षेत्रांमध्ये फंड मॅनेजरद्वारे पैसे गुंतवण्यात येतील.
दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय
दीर्घकाळ गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या गुंतवणुकदारांसाठी हा एक चांगला पर्याय असल्याचे क्वांट म्युच्युअल फंडने म्हटले आहे. जसे आरोग्य क्षेत्र वाढेल तसा गुंतवणुकदारांचा पैसाही वाढेल. मोठे तसेच कमी भांडवल असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीमही कमी होते, असे फंड हाऊसने म्हटले आहे.
फंड मॅनेज करताना भविष्यातील धोके ओळखून प्रिडिक्टिव्ह अॅनलिसिस टूलद्वारे कंपन्यांतील गुंतवणूक कमी जास्त केली जाईल, असे क्वांट म्युच्युअल फंडने म्हटले आहे.