Punjab and Sindh Bank FD Scheme: पंजाब अँड सिंध बँकेने एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. या सरकारी बँकेने नुकतीच दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. पंजाब आणि सिंध बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हा दर 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आला आहे. आता 1 जुलैपासून या बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 2.8 ते 7.10 टक्क्यांपर्यंत उपलब्ध आहेत. सामान्य एफडी व्यतिरिक्त, बँकेकडे 2 विशेष एफडी देखील आहेत. या एफडी 601 दिवस आणि 400 दिवसांच्या आहेत. आता ग्राहक या विशेष एफडीमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
1 वर्षाच्या आतील एफडी योजना
जर ग्राहकांनी 7 ते 30 दिवसांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीची गुंतवणूक केली, तर ग्राहकांना 2.8 टक्के व्याजदर मिळेल. 31 ते 45 दिवसांच्या गुंतवणुकीवर 3% व्याज दिले जाईल. तसेच ग्राहकांनी जर 46 ते 90 दिवसांसाठी मुदत ठेव (FD) ठेवल्यास 4.6 टक्के व्याजदर मिळेल. 91 ते 179 दिवसांच्या कालावधीसाठी 4.75 टक्के व्याज मिळेल. 180 ते 364 दिवसांच्या FD वर 6 टक्के व्याज दिल्या जात आहे.
1 वर्षाच्या पुढील एफडी योजना
- 1 वर्ष ते 399 दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणुकीवर 6.4 टक्के व्याज दिले जाईल.
- 400 दिवसांच्या विशेष एफडीवर 7.1 टक्के व्याज मिळेल.
- 401 ते 554 दिवसांच्या गुंतवणुकीवर 6.4 टक्के व्याज दिले जात आहे.
- 555 दिवसांच्या गुंतवणुकीवर 7.35 टक्के व्याज दिले जाईल.
- 601 दिवसांच्या एफडीवर 7 टक्के व्याज मिळेल.
- 602 दिवस ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 6.4 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.
- 2 वर्ष एक दिवस ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.75 टक्के व्याज दिले जाईल.
- 3 वर्षे ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणुकीवर 6.25 टक्के व्याज दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिक एफडी योजना
पंजाब अँड सिंध बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्व एफडी योजनांवर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. तर अति ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांव्यतिरिक्त 0.15 टक्के अतिरिक्त व्याज दिल्या जात आहे. हे व्याजदर 400, 555 आणि 601 दिवसांच्या FD वर उपलब्ध असतील.